14 May 2024 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार IPO GMP | पैसे तयार ठेवा, या 5 कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले होणार, पहिल्याच दिवशी मालामाल करणार Penny Stocks | रॉकेट वेगाने परतावा देणारे 5 शेअर्स, प्रतिदिन 20 टक्के अप्पर सर्किट हीट करून कमाई करा
x

राम जन्मभूमी आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आडवाणी आणि जोशींची अनुपस्थिती

Ram Mandir , Ayodhya Bajarangdal, Vinay Katiyar, Advani And Joshi

नवी दिल्ली, ५ ऑगस्ट : अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी दुपारी १२.४० वाजता रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी करतील. सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहोचतील.या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे.

कार्यक्रमासाठी पंतप्रधान लखनऊमध्ये दाखल झाले आहेत. मात्र या कार्यक्रमाला भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह यांना निमंत्रित करण्यात आलेलं नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि या नेत्यांचं वय पाहून त्यांना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यावरून भाजपाचे माजी खासदार विनय कटियार यांनी नाराजी व्यक्त केली.

लालकृष्ण आडवाणी यांची राम जन्मभूमी आंदोलनात अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढण्यात आली होती. आडवाणी, जोशी यांच्यासह उमा भारती यांचंही राम मंदिर आंदोलनात मोठं योगदान आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीवर हल्ला झाला. त्यानंतर न्यायालयात खटला दाखल झाला. त्यात या तिन्ही नेत्यांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते.

 

News English Summary: LK Advani has played a very important role in the Ram Janmabhoomi movement. A rath yatra from Somnath to Ayodhya was organized under his leadership. Along with Advani and Joshi, Uma Bharti has also made a significant contribution to the Ram Mandir movement.

News English Title: Ram Mandir Ayodhya Bajarangdal Leader Vinay Katiyar Said Efforts Should Be Done For Calling Advani And Joshi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RamMandir(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x