28 April 2024 9:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

विक्रमी वाढ | कोरोना रुग्ण संख्या २० लाखांच्या पार, मोदी सरकार गायब - राहुल गांधी

Congress Leader Rahul Gandhi, PM Narendra Modi, Coronavirus, Covid19

नवी दिल्ली, ०७ ऑगस्ट : भारतात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दरदिवशी ५०-५५ हजारांनी वाढणारी रुग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे.

भारतात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दरदिवशी ५०-५५ हजारांनी वाढणारी रुग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे.

दरम्यान ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण आहेत. तर अमेरिकेत ५० लाखांपेक्षा जास्त करोना रुग्णांची संख्या असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. करोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या पार गेली असून मोदी सरकार गायब आहे, असं ते म्हणाले.

“करोनाबाधितांच्या संख्येनं २० लाखांचा टप्पा पार केला आहे. परंतु मोदी सरकार गायब आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. यापूर्वीही त्यांनी करोनाच्या प्रादुर्भावावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी यापू्वी एक ट्विट करत १० ऑगस्टपूर्वी देशातील करोनाबाधितांची संख्या २० लाखांच्यावर जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसंच यासाठी सरकारला ठोस उपाययोजना करायला हव्या असंही त्यांनी म्हटलं होतं.

 

News English Summary: There were more than 5 million Corona patients in the United States. After this, Congress leader and former president Rahul Gandhi has targeted the Modi government. He said that the number of victims has crossed 20 lakhs and the Modi government is missing.

News English Title: Congress Leader Rahul Gandhi Slams Criticize Pm Narendra Modi Coronavirus Numbers Increased To 20 Lakhs News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x