7 May 2024 10:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

एका ट्विटमध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ असा उल्लेख केला | पण मी ती चूक सुधारली

BJP leader Shoumika Mahadik, Kolhapur, Parth Pawar, Ajit Pawar

कोल्हापूर, १३ ऑगस्ट : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होतं. पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.

तसेच महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांच्यावर मला १०० टक्के विश्वास आहे. पण तरीही सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असं वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा राज्य सरकार, सीबीआयचा प्रश्न आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं होतं.

विशेष म्हणजे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी सीबीआय चौकशीची आवश्यकता नसल्याचं म्हटलं होतं. अशातच पार्थ पवार यांनी मात्र सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यामुळे राष्ट्रवादीतच या विषयावरून वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे समोर आले होते. तसेच पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी करण्यासंबंधी विचारण्यात आलं असता माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही असं त्यांनी म्हटलं.

दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेनेचा सीबीआय चौकशीला विरोध असल्याने आणि परस्पर त्याविरोधात पवारांनी भाष्य केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. विशेष करून विरोधकांनी नेमका तोच मुद्दा उचलून धरल्यास आश्चर्य वाटणार नाही. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी त्याबद्दल ट्विट देखील केलं आहे.

मात्र आता भाजपच्या कोल्हापूर महिला मोर्च्याच्या जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी खोचक ट्विट करत पार्थ पवारांची खिल्ली उडवली आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “मगाशी एका ट्विट मध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ असा उल्लेख केला. माणसाकडून चुका होतात. जेमतेम 2-3 मिनिटात चूक कळताच मी ती सुधारली. पण तरीही मी चुकले हे मला बिलकुल मान्य आहे. मी चुकूच शकत नाही, मीच एकटी जाणती किंवा मीच फक्त मॅच्युअर व बाकी सारे इमॅच्युअर असा माझा अजिबात दावा नाही”.

 

News English Summary: BJP’s Kolhapur Mahila Morcha district president Shaumika Mahadik has ridiculed Parth Pawar by tweeting sharply. He tweeted, “In a previous tweet, I mistakenly mentioned Lord Krishna’s Partha. Mistakes are made by human beings.

News English Title: BJP Kolhapur leader Shoumika Mahadik comments over Parth Pawar News Latest updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x