28 April 2024 9:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

राहुल गांधी थेट माझ्याशी बोलले | त्यामुळे मी माझं ट्विट मागे घेत आहे - कपिल सिब्बल

Congress senior leader Kapil Sibal, Deletes his tweet, MP Rahul Gandhi

नवी दिल्ली, २४ ऑगस्ट : काँग्रेसच्या कार्यकारी समिती महत्त्वाची बैठक नवी दिल्लीत पार पडली. नेतृत्वाच्या मुद्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. २३ काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पक्ष नेतृत्वाबद्दल लिहिण्यात आलेल्या पत्राच्या टायमिंगबद्दल राहुल यांनी बोट ठेवलं. राजस्थानात पक्षाचं सरकार अडचणीत असतानाच पत्र का लिहिण्यात आलं, त्या पत्रावर कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा अपेक्षित असताना ते माध्यमांमध्ये कसं गेलं, असे सवाल राहुल यांनी उपस्थित केले.

भाजपासोबत हातमिळवणी करून सोनिया गांधींना पक्ष नेतृत्त्वात बदल करण्याची आवश्यकता असल्याचं पत्र लिहिण्यात आल्याचा अतिशय गंभीर आरोप त्यांनी केला. या आरोपांना माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांनी अतिशय आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपासोबत हातमिळवणी केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देईन, असा पवित्रा आझाद यांनी घेतला आहे.

दरम्यान, राहुल गांधींचं नाव घेऊन अतिशय आक्रमकपणे टीका करणाऱ्या सिब्बल यांनी काही मिनिटांनंतर ट्विट डिलीट केलं. त्यांनी दुसरं ट्विट करून याबद्दलची भूमिका स्पष्ट केली. ‘राहुल गांधी थेट माझ्याशी बोलले. माध्यमांमध्ये दाखवलं जाणारं विधान आपण केलंच नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मी माझं ट्विट मागे घेत आहे,’ असं सिब्बल यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं.

तत्पूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सिब्बल यांच्या ट्विटला उत्तर दिलं होतं. ‘राहुल गांधी तसं काहीही म्हणालेले नाहीत. यासंदर्भात कोणतीच चर्चा झालेली नाही. कृपया माध्यमांमधल्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. आपण आपापसात लढण्याऐवजी मोदी सरकारविरोधात लढणं गरजेचं आहे,’ असं सुरजेवालांनी ट्विटमध्ये म्हटलं. त्यानंतर सिब्बल यांनी राहुल यांच्यावर टीका करणारं ट्विट मागे घेतलं.

 

News English Summary: Kapil Sibal tweeted that he has been personally informed by Rahul Gandhi that he never made the “collusion with BJP” remark that was attributed to him. “Was informed by Rahul Gandhi personally that he never said what was attributed to him. I therefore withdraw my tweet.

News English Title: Congress senior leader Kapil Sibal deletes his tweet targeting congress leader Rahul Gandhi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#KapilSibal(1)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x