28 April 2024 7:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक खासदार मणिपूरमध्ये पोहोचले, तर मोदी भक्त शिंदे गटाच्या आमदारांकडून महिला नेत्यांबद्दल संतापजनक विधानं

INDIA opposition

Manipur Crisis | मणिपूरमधील हिंसाचाराचा प्रश्न लवकर सुटला नाही, तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिला आहे. मणिपूरला भेट दिल्यानंतर इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह अलायन्सच्या (इंडिया) खासदारांनी रविवारी दुसऱ्या दिवशी राजभवनात राज्यपाल अनसुईया उईके यांची भेट घेतली आणि ईशान्येकडील राज्यातील सद्यस्थितीचे निवेदन दिले. यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून खासदार अरविंद सावंत यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

बैठकीनंतर राजभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना या शिष्टमंडळाचे प्रमुख काँग्रेस नेते म्हणाले की, राज्यपालांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांनी देखील म्हणणे मान्य केले आहे. हिंसाचाराच्या घटनांबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आणि सांगितले की सर्व पक्षांच्या शिष्टमंडळाने मणिपूरला भेट देऊन लोकांशी संवाद साधावा जेणेकरून समुदायांमधील अविश्वास दूर होईल.

राज्यपालांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 140 हून अधिक मृत्यू, 500 हून अधिक जखमी, 5,000 हून अधिक घरे जळून राख होणे आणि 60,000 हून अधिक लोकांचे विस्थापन या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही समुदायातील लोकांच्या जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वांशिक संघर्षातील विध्वंसाच्या आकडेवारीचा हवाला देत निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल त्यांची निर्लज्ज उदासीनता दर्शवते.

शिंदे गटाच्या आमदाराकडून महिला खासदाराबद्दल धक्कादायक विधान
एकाबाजूला ज्या मणिपूरमध्ये भाजपाची सत्ता आहे तेथे महिलांना नग्न करून त्यांची परेड काढून नंतर सामूहिक करण्याचे संतापजनक प्रकार सुरु आहेत. देशभरातून या घटनेवरून रोष पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्याबाजूला मोदी भक्त झालेल्या शिंदे गटातील आमदारांकडून महिला नेत्यांबद्दल विवादित टिपण्या सुरु असल्याने संताप व्यक्त होतं आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांचं सौंदर्य पाहूनच आदित्य ठाकरे यांनी त्यांना खासदारकी दिली होती, असं चंद्रकांत खैरेच म्हणाले होते, असं धक्कादायक विधान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. या विधानावरून आदित्य ठाकरे यांनी सुद्धा संजय शिरसाट यांना चांगलेच झापले आहे. आदित्य ठाकरे यांनी शिरसाट यांच्यावर जोरदार टीका करताना सडक्या विचारांचे लोकं अजूनही राजकारणात कसे? असा सवाल केला आहे. सध्या समाज माध्यमांवर सुद्धा शिंदे गटावर प्रचंड टीका सुरु झाली आहे.

News Title : INDIA opposition 21 MPs reached Manipur check details on 30 July 2023.

हॅशटॅग्स

#INDIA opposition(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x