28 April 2024 10:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

बंदी नंतरही भाजपच्या नेत्यांकडून चायनीज ऍपचा वापर | ट्विटमध्येच दिला पुरावा

Congress leader Sachin Sawant, BJP using Chinese app, cam scanner

मुंबई, 25 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 जून रोजी भारतात टिकटॉक, कॅम स्कॅनर, यूसी ब्राऊजर, शेअरइट, हॅलो यांसारख्या 59 चायनीज ऍप्सवर बंदी घातली. भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

भारतात चायनीज ऍप्सवर बंदी घातल्यानंतर आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत, भारतात नवीन ऍप्स तयार करण्यात येत आहेत. नरेंद्र मोदींनी चायनीज ऍप्स बॅन केल्यानंतरही भाजपच्या नेत्यांकडून चायनीज ऍपचा वापर केला जात असल्याचं उघड करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

पंतप्रधान मोदींनी चायनीज ऍप कॅम स्कॅनर भारतात बॅन केल्यानंतरही भाजपकडून याचा वापर केला जात असल्याची बाब अतिशय निंदनीय असल्याचं म्हणत सचिन सावंत यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे.

पंतप्रधानांनी चीनचं CamScanner ऍप संपूर्ण भारतात बंद केलं होतं की केवळ सामान्य जनतेसाठी बंद केलं होतं, असा सवाल काँग्रेसकडून केला जात आहे. भाजप भारताचा भाग नाही का? की केवळ भाजपसाठी विशेष सवलत दिली आहे? असा खोचक प्रश्नही काँग्रेसकडून विचारला जात आहे. महाराष्ट्र यूथ काँग्रेसकडून, भाजपचं एक प्रसिद्धी पत्रक शेअर करण्यात आलं आहे. त्या प्रसिद्धी पत्रकाच्या शेवटी कॅम स्कॅनर ऍपचा वापर केल्याचं दिसत आहे. यावरुन सचिन सावंत यांनी भाजपला चायनीज ऍप बॅन करण्याची कृती म्हणजे केवळ दिखावा केल्याचा टोला लगावला आहे.

 

News English Summary: Following the ban on Chinese apps in India, new apps are now being developed in India under Self-Reliant India. Congress leader Sachin Sawant has strongly criticized the BJP leaders for using the Chinese app even after Narendra Modi banned it.

News English Title: Congress leader Sachin Sawant on BJP using Chinese app cam scanner News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x