8 May 2024 2:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची उच्चांकी आकडेवारी | तब्बल 16,867 नवे कोरोना रुग्ण

Maharashtra, Corona Virus, Covid19

मुंबई, २९ ऑगस्ट: लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारने राज्यांना अटी घालून दिलेल्या असतानाच राज्यातून कोरोना रुग्णांबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात आज एकाच दिवशी तब्बल १६ हजार ८६७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ लाख ६४ हजार २८१ वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये कोरोनामुळे ३२८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ११,५४१ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात दरदिवशी कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली विक्रमी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. त्यातच आता केंद्राच्या मदतीशिवाय राज्यांना लॉकडाऊन जाहीर करणं शक्य होणार नसल्याने कोरोनाला रोखणार तरी कसं, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून दररोज १४ ते १५ हजारांच्या सरासरीनं रुग्ण आढळून येत आहे. रुग्णवाढीच्या या वेगामुळे एकूण रुग्णसंख्या वेगानं वाढत आहे. त्यामुळे काहीशी चिंताजनक स्थिती असताना शनिवारी राज्यात १६ हजार ८६७ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असून, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या साडेसात लाखांच्या पुढे गेली आहे.

 

News English Summary: While the central government has imposed conditions on the states for lockdown, shocking statistics on coronavirus have emerged from the state. In Maharashtra, 16 thousand 867 new corona patients have been found on the same day. As a result, the number of coronary heart disease patients in the state has reached 7 lakh 64 thousand 281.

News English Title: Coronavirus In Maharashtra Newly 16867 Patients Have Been Tested As Positive In Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x