13 December 2024 2:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा
x

Unlock 4.0 च्या नव्या गाईडलाईन्स | 1 सप्टेंबरपासून काय सुरु काय बंद

Unlock 4, New guidelines, 1 September

नवी दिल्ली, २९ ऑगस्ट: कोरोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध आता आणखी शिथिल होणार आहेत. Unlock 4.0 संदर्भात नवीन नियम केंद्र सरकारने (Unlock 4.0 guidelines) जारी केले आहेत. येत्या 1 सप्टेंबरपासून लॉकडाऊनचे नियम आणखी शिथिल होतील. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता मुभा असेल. तसंच राज्यांतर्गत प्रवासासाठीही वेगळी परवानगीची आवश्यकता नाही, असं केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स सांगतात. या नव्या नियमांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत शाळा बंदच राहतील, असं सांगण्यात आलं आहे. मेट्रो मात्र 7 सप्टेंबरपासून सुरू करता येऊ शकेल, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.

शाळा बंद असल्या तरी अनलॉक 4.0 मध्ये नववीच्या वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल तेव्हा शाळेत जायची परवानगी देण्यात आली आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता E pass किंवा परवानगीची आवश्यकता नाही.

अनलॉक ४ साठीच्या मार्गदर्शक सूचना आज केंद्रीय गृहमंत्रालयानं जाहीर केल्या आहेत. अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारनं मेट्रो सेवा सुरू करण्यासह सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व धार्मिक सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. २१ सप्टेंबरपासून राज्यात हे कार्यक्रम घेता येणार असून, त्यासाठी काही बंधन घालण्यात आली आहेत.

गृहमंत्रालयानं जाहीर केलेल्या मार्गदर्शक एकाच छताखाली होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये केवळ १०० लोकांनाच सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर अशा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना तोंडावर मास्क, सोशल डिस्टन्सिगचं पालन, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर यांचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर करोनासंदर्भात सरकारनं जाहीर केलेल्या इतर नियमाचं पालन करण्यात यावं, असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

हे राहणार बंद…

अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकार चित्रपटगृह खुली करण्यास परवानगी देण्याची अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांच्या बाबतीतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र, चित्रपटगृहांसह स्विमिंग पूल (जलतरण तलाव), आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा (विशेष विमान सेवा वगळून) सप्टेंबरमध्येही बंदच राहणार आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारनं शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

 

News English Summary: The Union Home Ministry on Saturday issued the Unlock 4 guidelines under which metro trains, suspended since March 22 in wake of the coronavirus outbreak, will be allowed to resume services from September 7 in a graded manner, while public congregations of up to 100 people will be permitted from September 21.

News English Title: Unlock 4 Find out what will start from September 1 what will stop News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x