3 May 2024 12:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा? IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा
x

भारत कोरोनासंबंधित जागतिक विक्रम रचतोय | एका दिवसात ८०,००० बाधित रुग्ण

India, Corona Virus, Covid19

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : लॉकडाउनच्या सुरूवातीच्या टप्प्यात नियंत्रणात असलेली देशातील रुग्णसंख्या ३५ लाखांच्या पुढे गेली आहे. मागील काही आठवड्यांपासून देशातील रुग्णसंख्यावाढीचा वेग प्रचंड वाढला असून, कमी कालावधीत दुप्पट रुग्णसंख्या होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. रुग्णवाढीच्या अतिवेगामुळे भारताच्या नावे नकोशा जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात सतत 75 हजारहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या 36 लाख 21 हजार 246 एकूण कोरोना रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत देशात 78 हजार 512 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. 971 जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे देशात Unlock 4.0 घोषणा करण्यात आली आहे. याअंतगर्त मेट्रो सेवसह इतर सेवा सुरू करण्याचे केंद्र सरकारनं जाहीर केले आहे.

इंडियन काउन्सिल ऑप मेडिकल रिसर्चने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 4 कोटी 23 लाख 07 हजार 914 टेस्टिंग झाल्या आहेत. यातील 8 लाख 46 हजार 278 सॅम्पल रविवारी टेस्टिंग करण्यात आले.

 

News English Summary: India’s Covid-19 case tally today crossed the 35 lakh-mark with a spike of of 78,512 new coronavirus cases. The deaths due to the virus have risen to 64,469 as 971 deaths were reported across the nation in the last 24 hours. Globally, the virus has now taken over 8 lakh lives. Stay with TOI for live updates.

News English Title: India Crosses 80000 Cases In A Day First Country In The World News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x