29 April 2024 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
x

साधूंना मंत्रिपद! तर तरुणांना 'पकोडे' व 'पानाच्या टपऱ्या' टाकण्याचे सल्ले

त्रिपुरा : तरुणांना मोठं मोठी रोजगारांची स्वप्नं दाखवत भाजप सरकार सत्तेत आलं खरं पण सत्तेत आल्यावर मात्र भाजप नेत्यांचे रोजगाराचे अजब सल्ले ऐकण्याची वेळ तरुणांवर आली आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी तरुणांना पानाच्या टपऱ्या टाकण्याचा सल्ला दिला आहे.

देशातील तरुणांनी सरकारी नोकरीसाठी नेत्यांच्या मागे पूढे धावण्यापेक्षा जर पानाची टपरी सुरु केली असती तर त्यांच्या बँक खात्यात ५ लाख रूपये जमा झाले असते असा अजब सल्ला त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी दिला आहे. शनिवारी युवकांना संबोधित करताना ते म्हणाले की,’ युवकांनी सरकारी नोकरीसाठी राजकीय नेत्यांच्या मागे जाऊ नये. त्यांनी पानाचे दुकान सुरू करावे’. काही दिवसांपूर्वी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देशातील तरुणांना नोकरी करण्याऐवजी पकोडे म्हणजे भज्या विकण्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता.

विरोधकांनी भाजपच्या तसेच नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं होत. त्याआधी विप्लवकुमार देव यांनी जे प्रशासनात आहेत त्यांना समाज बांधायचा असतो आणि सिव्हिल इंजिनियर्सना याचे उत्तम ज्ञान असते. त्यामुळे ज्यांची मेकॅनिकल इंजिनियरींगची पार्श्वभूमी आहे त्यांनी नागरी सेवा क्षेत्रात जाऊ नये असा विचित्र तर्क त्यांनी मांडला होता. महाभारताच्या काळापासून भारतात इंटरनेट होते असा जावईशोध लावण्याचा विश्वविक्रम सुद्धा त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांच्या नावावर आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x