10 May 2025 3:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील १२० आरोग्य कर्मचारी राजीनामा देण्याच्या तयारीत

Pune jumbo Covid Centre, Health staff Resign, Marathi News ABP Maza

पुणे, ६ सप्टेंबर : पुण्यातील जम्बो कोव्हीड सेंटर मधील १२० कर्मचाऱ्यांचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये ४० डॉक्टर स्टाफ, ८० नर्सिंग स्टाफचा समावेश आहे. राजीनाम्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

दोन दिवसांपूर्वी जम्बो मध्ये सुविधांचा अभाव असल्याची ऑडीओ क्लिपही व्हायरल झाली होती. औषध साठा, उपचार सामुग्रीचा पुरवठा होत नसल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या.

दरम्यान, पुणे शहर हे देशातील करोना संसर्गाचा हॉटस्पॉट बनले आहे. याबाबत मुंबई आणि दिल्ली या महानगरांनाही पुण्याने मागे टाकले असून दररोज सुमारे दीड हजार नागरिकांना करोनाची बाधा होत असल्याचे समोर येत आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडाही सरासरी चाळीशी गाठत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

News English Summary: Sources say that 120 employees of Jumbo Coveid Center in Pune have resigned. This includes 40 doctor staff, 80 nursing staff. The reason for the resignation is still unclear.

News English Title: Pune jumbo Covid Centre 120 staff along with doctors has resign source Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या