3 May 2025 4:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

राज ठाकरे घेणार स्थानिक आदिवासी, मच्छीमार व शेतकऱ्यांची भेट

पालघर : राज ठाकरे यांच्या वसईमधील जाहीर सभेनंतर संपूर्ण पालघर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. सध्या वसई, नालासोपारा विरार आणि पालघर मध्ये भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांचेच आमदार आणि खासदार कित्येक वर्ष सत्तेत असून इथली परिस्थिती आणि पायाभूत सुविधांमध्ये काहीच फरक पडला नसून वाढत्या लोकसंख्येनंतर तर परिस्थिती अधिकच कठीण झाली आहे.

विद्यमान पक्षाचे आमदार, खासदार आणि त्यांचे समर्थक रग्गड झाले असून सामान्य जनता, स्थानिक आदिवासी, मच्छीमार आणि शेतकरी असे सर्वच हवालदिल झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील वाढवण, जिंदाल बंदर, बुलेट-ट्रेन आदी विनाशकारी प्रकल्पा बरोबर सूर्याचे पाणी, कुपोषण, रोजगार अशा महत्वाच्या प्रश्नांमुळे स्थानिक अक्षरशः होरपळून निघाले आहेत.

२०१४ नंतर सत्ताधारी कोणत्याही ठोस उपाययोजना आखून त्या सत्यात उतरविण्यात अपयशी ठरले आहेत. पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन त्याचा काहीच फायदा झाला नाही अशी स्थानिकांची ठाम धारणा झाली आहे. सूर्या प्रकल्पाचे पाणी पालघर जिल्ह्याबाहेर वळवून स्थानिक सिंचन क्षेत्र भकास करण्याचे काम युती सरकारने केल्याने डहाणू, पालघर, वाडा आणि विक्रमगड भागातील सामान्य नागरिकांना स्वतःच्या हक्काचे पाणी मिळत नसल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

पालघर जिल्ह्यात कुपोषणाची स्थिती अतिशय गंभीर असून इथल्या आरोग्यव्यवस्थेचे इतकी बिकट आहे की, अनेकांना उपचारासाठी गुजरात व सेलवास येथील रुग्णालयात उपचारांसाठी जावे लागते. जिंदाल जेट्टीमुळे परिसरातील नवापूर, मुरबे, सातपाटी, उच्छेळी-दांडी, वडराई सारख्या ठिकाणी मासेमारी बंदराना धोका पोहोचून त्या बंदरासमोरील मासळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला ‘गोल्डन बेल्ट’च पूर्णपणे संपुष्ठात येणार होता. तसेच स्थानिकांचा जेट्टीला प्रखर विरोध असताना सुद्धा जवळच अणुऊर्जा प्रकल्प होणार असल्याने प्रदूषणात प्रचंड वाढ होऊन येथील पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे, तरी सुद्धा भाजप शिवसेना सरकारने वाढवण बंदराची घोषणा करून इथल्या स्थानिकांच्या भावनांचा अनादर केला आहे अशी त्यांची ठाम भावना आहे.

संपूर्ण पालघर ठाण्यातून जाणारी प्रस्तावित अहमदाबाद बुलेट ट्रेनने १४८.७२ किमीच्या मार्गावरील लाखो शेतकरी कुटुंबीयांच्या जमिनी, घरे आणि शेती उध्वस्त होणार आहेत, त्यामुळे प्रकल्पबाधितांचा भाजप शिवसेनेवर प्रचंड रोष आहे. इतकेच नाही तर, डेडिकेटेट फ्रेट कॉरिडॉर व मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे अशा प्रकल्पामुळे येथील स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्यांची उपजीविका असलेल्या शेत जमिनीवर वरवंटा फिरताना बघावा लागू शकतो.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढीस लागली आहे. स्थानिक आदिवासी तरुणांना पालघर जिल्हा कौशल्य रोजगार विभागांतर्गत नोकऱ्यांचे आमिष भाजप शिवसेना सरकारने दाखविले होते. परंतु स्थानिकांऐवजी डोळ्यासमोर बाहेरील उमेदवाराना सर्व दिलं जात आहे. पालघर जिल्ह्यातील नोकरभरतीच्या परीक्षांचे पेपर नेहमीच फुटत असल्याने त्याचा फायदा बाहेरील उमेदवारांना मिळत असल्याचा आरोप स्थानिक तरुण करीत आहेत. रेल्वे लोकल प्रवास म्हणजे जीवघेणी स्पर्धा हे नित्याचेच प्रकार झाले आहेत. स्थानिक रेल्वे प्रवाश्यांचा संघटनांनी अनेक पाठपुरावे करून सुद्धा लोकल सेवेत वाढ होत नाही. तसेच लांब पल्यांच्या गाड्यांना थांबाच दिला जात नसल्याने येथील रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड रोष आहे.

वसई तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा तीनतेरा झाले असून दर आठवड्यात ३ ते ४ मुलींच्या अपहरणाच्या घटना, लैंगिक शोषण, खून, चेन स्नॅचिंग, शासकीय जागेवरील अतिक्रमण, खंडणी आदी गंभीर विषय असून ते स्थानिकांसाठी खूप महत्वाचे आहेत.

पालघर जिल्ह्यात अनेक समस्यांनी सर्वच थरातील स्थनिक अनेक वर्षांपासून हैराण असून भाजप आणि शिवसेनेचे सरकार येऊन सुद्धा काहीच परिस्थिती बदललेली नाही. बहुजन विकास आघाडीचे आमदार काय करतात ते कोणी वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे १ मे रोजी होणाऱ्या सभेत या सर्व समस्यांचा अभ्यास करून राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणा दरम्यान जर नेमका स्थानिकांच्या मर्मावर बोट ठेवल्यास २०१९ मधील राजकीय समीकरण बदलण्यास वेळ लागणार नाही. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण शारीरीक सेनेचे राज्य उपाध्यक्ष अजय दाभोळकर हे राज ठाकरे यांची वसईतील सभा लक्षवेधी ठरण्यासाठी प्रचंड मेहेनत घेताना दिसत आहेत. मनसेचे स्थानिक कार्यकर्ते सुद्धा राज ठाकरे यांची सभा यशस्वी होण्यासाठी स्फूर्तीने मेहेनत घेताना दिसत आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thakare(62)#Raj Thakarey(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या