30 April 2024 6:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

मोदीजी, ही शेतकऱ्यांशी बेईमानी नाही तर काय | बच्चू कडुंचा संतप्त सवाल

Minister Bacchu Kadu, PM Narendra Modi, Onion export, Marathi News ABP Maza

मुंबई, १५ सप्टेंबर : केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी उठवलेली कांद्यावरील निर्यातबंदी आता पुन्हा लागू केली आहे. त्यामुळे लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

कांद्याच्या निर्यातबंदीचे काही कारण नव्हते. कांदा हा जीवनावश्यक वस्तूंमधून काढला होता. कांदा नाही खाल्ला तर कुणी मरत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे होता. मात्र, मोदी सरकारने पुन्हा शेतकऱ्याच्या छातीवर तलवार चालवून त्याला रक्तबंबाळ केल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले.

तसेच कांदा प्रश्नावर दिल्लीत जाऊन छुप्या पध्दतीने आंदोलन करणार असल्याचा इशाराही राज्यमंत्री बच्चू यांनी केंद्र सरकारला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी नाशिकच्या सभेत म्हणायचे मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बेईमानी करणार नाही. मग ही बेईमानी नाही तर काय आहे, असा सवाल बच्चू कडू यांनी मोदींना विचारला.

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. यावर्षी ऐन उन्हाळ्यात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांनी आपला कांदा कवडीमोल भावात विकला होता. आता कांद्याचे दर वाढत असतानाच केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रात कांडा उत्पादक शेतकरी नाराज झाला असून केंद्राने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे ती तात्काळ उठवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

तसेच मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये (हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणूकाआधी) घातलेली निर्यात बंदी आता मार्चमध्ये उठवली होती. त्यानंतर बरोबर सहा महिन्यात पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. हे भाजप सरकार शेतकर्‍यांना परावलंबी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकर्‍यांनी ६० टक्के साठवलेला कांदा आधीच खराब झाला आहे आणि आता भाजप सरकारने निर्यात बंदी घातल्यामुळे शेतकर्‍यांना कांदा कवडीमोल भावाने विकण्याची वेळ येणार आहे. केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे असा आरोपही राष्ट्रवादीचे महेश तपासे यांनी केला आहे.

 

News English Summary: The central government has now re-imposed the export ban on onions, which was lifted a few months ago. As a result, millions of onion growers will be affected. Against this backdrop, Minister of State Bachchu Kadu has strongly criticized the Central Government.

News English Title: Minister Bacchu Kadu take a dig on PM Narendra Modi over onion export ban Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#BacchuKadu(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x