6 May 2024 5:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा?
x

मोदीजी चीनला देशातून केव्हा बाहेर काढणार | काँग्रेसचा खोचक सवाल

Congress party, Modi government, India China Ladakh, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १५ सप्टेंबर : भारत-चीन सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर वारंवार विविध प्रकारे चीन भारतील सैन्याला त्रास देत आहे. त्यानंतर केंद्र सरकारने चीनला धडा शिकवण्याच्या सर्व योजना आखल्या आहेत. या विवादादरम्यान आज संसदेच्या अधिवेशनात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या रक्षणासाठी विविध योजना सुरू असल्याचे सांगितले. चीनला विविध प्रकारे धडा शिकवला जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यादरम्यान काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यात काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सुरजेवाला यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, मा. राजनाथजी देश सैन्यासोबत एकजूट आहे…मात्र हे सांगा…चीनने आमच्या जागेत कब्जा करण्याचं धाडस कसं काय केलं? मोदींनीं चीनद्वारे देशाच्या सीमेत घुसखोरी करण्याबाबत गोंधळ का निर्माण करण्यात आला? चीनला देशातून केव्हा बाहेर काढणार?

सुरजेवाला यांनी ट्विट करीत राजनाथ सिंहासमोर प्रश्नांची यादीत समोर ठेवली आहे. सुरजेवाला यांच्या ट्विटवर अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काँग्रेसच्या काळात चीनकडून कसा त्रास दिला जात होता, अशा आशयाची प्रतिक्रिया एका वापरकर्त्याने दिली आहे.

 

News English Summary: India is “very serious about issues of sovereignty” and the country is prepared for “all contingencies” to ensure that it is maintained, Union minister Rajnath Singh told Parliament today in what was seen as a strong warning to China amid repeated transgressions at the Line of Actual Control.

News English Title: Congress party slams Modi government over India China Ladakh Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x