1 May 2024 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील हे 2 रुपये ते 9 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI च्या 5 मल्टिबॅगर SIP योजना सेव्ह करा, दरवर्षी पैसा वेगाने वाढवा Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल
x

CAA चं लोकसभेत समर्थन राज्यसभेत यू-टर्न | कृषी विधेयकाला लोकसभेत पाठिंबा राज्यसभेत सभात्याग

BJP MLA Ashish Shalar, Shivsena, MP Sanjay Raut, Agriculture Bills, Agriculture Ordinances, Marathi News ABP Maza

मुंबई, २१ सप्टेंबर :  संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने कृषिविषयक तीन विधेयके लोकसभा आणि राज्यसभेत पारित करून घेतली आहे. काल संध्याकाळी राज्यसभेत प्रचंड गोंधळामध्येही ही विधेयके राज्यसभेत आवाजी मतदानाने पारीत करण्यात आली. दरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने लोकसभेत या विधेयकांना पाठिंबा दिला होता, तर राज्यसभेत विरोध केला होता. दरम्यान, शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे.

या विधेयकासंदर्भात शिवसेनेनं संसदेच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळी भूमिका घेतल्यानं भाजपानं प्रश्न उपस्थित करत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून शिवसेनेवर टीका केली आहे. “शिवसेनेनं सीएएचे लोकसभेत समर्थन आणि यू-टर्न घेऊन राज्यसभेत विरोध केला होता. आता कृषी विधेयकालाही लोकसभेत पाठिंबा आणि राज्यसभेत विरोधात भाषण करुन सभात्याग. म्हणजे महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत ‘सेम टू शेम!’ गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ!!”, असं म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर त्यांच्या परस्परविरोधी भूमिकेवरून टीका केली आहे.

 

News English Summary: The ruling Shiv Sena had supported the bill in the Lok Sabha and opposed it in the Rajya Sabha. Meanwhile, BJP MLA Ashish Shelar has strongly criticized the Shiv Sena’s double standard.

News English Title: BJP MLA Ashish Shalar over Shivsena MP Sanjay Raut Agriculture Bills Agriculture Ordinances Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Ashish Shelar(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x