14 May 2025 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CDSL Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने घटवली रेटिंग, शेअरची टार्गेट प्राईस सुद्धा अपडेट केली - NSE: CDSL RVNL Share Price | मल्टीबैगर शेअरमध्ये तेजीचे संकेत, अपसाइड टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RVNL IRFC Share Price | 22 टक्के तेजीचे संकेत, पीएसयू शेअर्सची जोरदार खरेदी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Yes Bank Share Price | येस बँक शेअर्ससाठी SELL रेटिंग, पेनी स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत - NSE: YESBANK HFCL Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार या स्वस्त शेअरवर, रिलायन्स ग्रुपचीही हिस्सेदारी, टार्गेट नोट करा - NSE: HFCL Tata Steel Share Price | ग्लोबल नुवामा फर्मकडून BUY रेटिंग, टाटा स्टील शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATASTEEL Tata Motors Share Price | बोफा सिक्युरिटीज बुलिश, टार्गेट प्राईस वाढवली, फायद्याची अपडेट आली - NSE: TATAMOTORS
x

शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे | कृषी विधेयकावरून फडणवीसांचा टोला

Shivsena, Confused party, Devendra Fadnavis, Marathi News ABP Maza

नागपूर, २१ सप्टेंबर : ‘शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे. त्यांना अनेक मुद्द्यांवर भूमिकाच घेता येत नाही आणि आता तर त्यांना त्यांची सवयही झाली आहे. यात आम्हालाही आता नवल वाटत नाही,’ अशी खोचक टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विषयक विधेयकांच्या संदर्भात ते नागपूरमध्ये बोलत होते. ही विधेयके ऐतिहासिक असून यामुळं शेतकरी आपला माल देशभरात कुठेही विकू शकतो, असं फडणवीस म्हणाले. कृषी विधेयकाला शिवसेनेनं राज्यसभेत विरोध केला. ‘ही विधेयके इतकी क्रांतिकारक आहेत तर यापुढं कुठलाही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी सरकार देणार का, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली.

तर दुसरीकडे फडणवीस यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. शेतकरी विधेयकावर कॉंग्रेसचा आक्षेप बेगडी असून ते लबाडी करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. शेतकरी विधेयकावरुन कॉंग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी काल गदारोळ घातला. देशाच्या संसदेत असं वर्तन कधी पाहील नव्हतं. कॉंग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष खालच्या स्तरावर जाऊन काम करतायत. कॉंग्रेसला शेतकऱ्यांविषयी अजिबात प्रेम नाही. ते केवळ राजकारण करतायत असेही ते म्हणाले.

हमीभाव सरकार देणारच आहे असे पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय. जो कायदा तयार केलाय त्यात कंत्राटी पद्धतीने माल विकता येईल. खासगी क्षेत्रातील लोक शेतकऱ्याशी करार करुन माल विकत घेतील. लहान शेतकऱ्याला वाहतूक परवडत नाही, तो तंत्रज्ञान वापरत नाही. पण यामुळे साखळी तयार होईल. शेतकऱ्याने तयार केलेल्या मालावर त्याला ८ टक्के द्यावे लागत होते पण आता तस होणार नसल्याचे ते म्हणाले.

 

News English Summary: Shiv Sena is a confused party. They can’t even take a stand on many issues and now they have got used to it. We are not surprised about this now, ‘said Devendra Fadnavis, Leader of Opposition in the state.

News English Title: Shivsena is totally confused party says Devendra Fadnavis Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या