28 April 2024 11:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

कृषी उत्पादनांच्या खुल्या बाजारपेठेबद्दल सांगता | मग कांद्या निर्यात बंदी का करता

Union government, Onion export, Sharad Pawar, Marathi News ABP Maza

मुंबई, २२ सप्टेंबर : कृषी विषयक विधेयकांवरुन राज्यसभेत गोंधळ घातल्याने निलंबित झालेले आठ खासदार अन्नत्याग केला आहे. आज दिवसभर मीही अन्नत्याग करुन त्यांच्या अभियानात सहभागी होणार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी राज्यसभेच्या उपसभापतींसह केंद्र सरकारच्या कृषी धोरणावरही प्रश्न उपस्थित केले. एकाबाजूला केंद्र सरकार कृषी उत्पादनांच्या खुल्या बाजारपेठेबद्दल सांगतं मात्र दुसऱ्या बाजूला कांद्या निर्यात बंदी करत हे चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं.

एकीकडे कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असतानाच सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, कंगना राणौत आणि शिवसेना वाद, तसेच नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला झालेला मारहाण यावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशी मागणी करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज नाही, अशा स्पष्ट शब्दात शरद पवार यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांना सुनावले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार नवनीत राणा तसेच इतर काही जणांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात राष्ट्पती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.

 

News English Summary: NCP President Sharad Pawar a key constituent in the tri-party combine governing Maharashtra – said he has discussed the issue with Union Commerce Minister Piyush Goyal and urged him to rethink it. “The ban jeopardizes India’s export share in the onion markets of Gulf countries, Sri Lanka and Bangladesh, Mr Pawar said in a tweet, adding that it could allow other countries, such as Pakistan, to displace India. Pawar criticized Modi government over onion export banned after agriculture policy.

News English Title: Union government was banned onion export said Sharad Pawar Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x