30 April 2024 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून स्टॉकची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, खरेदी करणार?
x

मुंबई तुंबली | पावसाने गोरगरिबांचे संसार उध्वस्त | पण तरीही ते घरीच

BJP Leader MLA Atul Bhatkhalkar, CM Uddhav Thackeray, Water Logging, Marathi News ABP Maza

मुंबई, २३ सप्टेंबर : मुंबईत रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे या भागात पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. मुंबईतील लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर रस्त्या-रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. तर बेस्ट बसची वाहतूकही वळवण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या सायन, चुनाभट्टी, कुर्ला या स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे सीएसएमटी ते ठाणे, तर सीएसएमटी ते वाशी ही रेल्वे सेवा रद्द केली आहे. तसेच ठाणे ते कर्जत, कसारा, वाशी, पनवेल या ठिकाणी विशेष लोकल धावत आहेत. त्यामुळे मुंबईतील चारही लाईन बंद असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले. वस्त्यांमध्ये पाण्याचे लोट शिरले. गोरगरिबांचे संसार पुन्हा उध्वस्त झाले. महापालिकेने मुंबई तुंबवून दाखवली. संततधार पावसात मुंबईकरांची परवड. महापालिका मख्ख, राज्य सरकार ढिम्म, मुंबईकर बेहाल त्यासाठी दार उघड भावा दार उघड अशा शब्दात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

याबाबत अतुल भातखळकर म्हणाले की, मुंबई महापालिकेने रात्रीच्या पावसात पुन्हा एकदा शहर तुंबवून दाखवलं, नालेसफाई टक्केवारी, कोविड सेंटरमधील टक्केवारी, महापौरांवर आरोप, या भ्रष्टाचाराने लडबडलेल्या मुंबई महापालिकेच्या कारभारामुळे सर्वसामान्य मुंबईकरांवर ही परिस्थिती उद्भवली आहे. उपनगरातील पालकमंत्री आदित्य ठाकरे उपनगराकडे फिरकायला तयार नाही, ते केवळ पर्यटनात आणि ताज महाल हॉटेलच्या करारात रमले आहेत, आतातरी पालकमंत्र्यानी दौरा करावा आणि झोपडपट्टीतील लोकांसाठी प्रत्येक १० हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

 

News English Summary: Heavy rains lashed Mumbai. The world of the poor was ruined again. Municipal Corporation flooded Mumbai. Affordability of Mumbaikars in incessant rains. BJP MLA Atul Bhatkhalkar has lashed out at Chief Minister Uddhav Thackeray, saying that he still at home.

News English Title: Opponents BJP Leader MLA Atul Bhatkhalkar Criticized CM Uddhav Thackeray over Mumbai Water Logging Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#AtulBhatkhalkar(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x