3 May 2025 10:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

कंगनाने ड्रग्स घेत असल्याचं मान्य केलं | NCB ने तिला समन्स का पाठवला नाही?

Actress Nagma, NCB, Summoned Kangana Ranaut, Drug addiction, Marathi News ABP Maza

मुंबई, २४ सप्टेंबर: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासादरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. त्यानंतर सध्या बॉलिवूडमध्ये ड्रग्ज कनेक्शनबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. सुशांत प्रकरणात NCB ने रिया चक्रवर्तीची चौकशी केली. या चौकशीदरम्यान सुशांत व ड्रग्जच्या कनेक्शनबरोबरच अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. ही नावं ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.

एनसीबीने रिया चक्रवर्ती, ड्रग पेडलर्ससह अन्य जणांना अटक केली आहे. सांगितले जात आहे की अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोच्या (NCB) रडारवर कमीत कमी 50 हून अधिक सेलिब्रिटी आहेत. यामध्ये बड्या निर्मात्यांबरोबरच दिग्दर्शकांचाही समावेश आहे. अमली पदार्थाबाबत तपास करीत असलेल्या एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोनसह श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि अन्य जणांचा चौकशीसाठी समन्स पाठविला आहे. एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनबाबत बेधडकपणे बोलत आहे. सध्या तिचा एका व्हिडीओही व्हायरल झालाय ज्यात ती म्हणाली होती की, ती ड्रग अ‍ॅडिक्ट होती. यावरून अभिनेत्री आणि कॉंग्रेस नेत्या नगमा यांनी प्रश्न उपस्थित केलाय की, NCB ने आतापर्यंत कंगनाला समन्स का पाठवला नाही? कारण तिने तर मान्य केलंय की, ती ड्रग्स घेत होती.

नगमा असंही म्हणाल्या की, NCB चौकशीदरम्यान अभिनेत्रींशी संबधित माहिती मीडियात शेअर करून टॉप बॉलिवूड अभिनेत्रींची इमेज खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. नगमाने ट्विटमध्ये लिहिले की, एनसीबीने कंगनाला समन्स का पाठवला नाही. तिने तर स्वत: ड्रग्स घेण्याची बाब मान्य केलीय. ते व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर दुसऱ्या अभिनेत्रींना समन्स पाठवू शकतात? NCB ची ड्यूटी आहे का की, टॉप अभिनेत्रींशी संबंधित माहिती मीडियात लीक करावी?

 

News English Summary: Actor and Congress leader Nagma has questioned Narcotics Control Bureau (NCB) on why it has not summoned Bollywood actress Kangana Ranaut who has admitted to taking drugs in the past. Nagma condemned NCB’s investigation process for sharing the probe information with media. According to Nagma, NCB is trying to malign the image of top actresses.

News English Title: Actress Nagma Raises question why NCB not summoned Kangana Ranaut who admitted drug addiction Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या