3 May 2025 7:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

समविचारी पक्ष असल्याने युतीत निवडणूक लढवली | आता भाजपशी वैचारिक मतभेदांचा साक्षात्कार?

Devendra Fadnavis, Meet, MP Sanjay Raut, Ideological differences

मुंबई, २७ सप्टेंबर : देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी झालेल्या भेटीबद्दल खुलासा केला. संजय राऊत यांनी म्हटले की, ही बैठक गुप्त नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या भेटीबद्दल माहिती होती. ‘सामना’साठी देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत घेण्याचा आमचा विचार आहे. त्याविषयीच आम्ही काल चर्चा केली. परंतु, आपली जाहीर मुलाखत घेण्यात यावी, अशी इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याचे राऊत यांनी सांगितले.

तसेच देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते आहेत. याशिवाय, बिहार विधानसभा निवडणुकीचेही ते प्रभारी आहेत. मी त्यांच्याशी काल काही मुद्द्यांवर चर्चा केली. आमच्यात भले वैचारिक मतभेद असतील पण आम्ही शत्रू नव्हे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. गोपीयन भेट म्हणायला आम्ही काही बंकरमध्ये भेटलो नाही. गोपनीय म्हणायचं तर आम्ही गोपनीय पद्धतीनं भोजन केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक वाद होतात पण वैयक्तिक वाद होत नाहीत. सत्ताधारी आणि विरोधक भेटतच असतात. भाजपसोबत सत्तेत असताना मी शरद पवार यांना भेटायचो. आजही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले नेते मानतो, असेही राऊत यांनी सांगितले.

काल संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त भेटीमुळे राज्यात राजकीय भुकंप येणार का? जुने मित्र पुन्हा एकत्र येणार का? महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या भेटीमुळे हे भेट झाली का? अशा चर्चा समाजमाध्यमांमध्ये रंगल्या होत्या. मात्र आज खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर भाष्य करुन चर्चांवर पडदा पाडला आहे. दरम्यान, ही भेट सामनाच्या मुलाखतीसाठी झाली असल्याचे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काल ट्विटद्वारे स्पष्ट केले होते.

 

News English Summary: I met Devendra Fadnavis yesterday to discuss certain issues. He is a former CM. Also, he’s the leader of opposition in Maharashtra & Bihar Polls in charge of BJP. There can be ideological differences but we are not enemies. CM was aware about our meeting said Shiv Sena MP Sanjay Raut,

News English Title: I met Devendra Fadnavis here can be ideological differences but we are not enemies says MP Sanjay Raut Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या