12 May 2025 12:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

शिक्षण विभागाची 'डिजिटल'माघार, बारावीचे प्रवेश यंदा ऑफलाइनच

मुंबई : शालेय शिक्षण विभागाने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही माघार घेत बारावीच्या ऑनलाइन प्रवेशाची तयारी नसल्याने, बारावीचे प्रवेश प्रक्रिया पुन्हा ऑफलाइन करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या शालेय शिक्षण विभागाची ‘डिजिटल’ म्हणजे ऑनलाइन प्रवेश घेण्याची तयारी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

११वी चे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होताच ११वी साठी नामांकित व आवडीच्या महाविद्यालयातील प्रवेशाचा मार्ग विद्यार्थी आणि पालकांसाठी बंद झाला होता. ११वी चे प्रवेश ऑनलाइन केल्याने १२वी साठी महाविद्यालय बदलणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट झालं होत. एकूणच कॉलेज बदलणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आलं आहे. महाविद्यालय बदलण्याच्या वाढत्या प्रमाणाला चाप लावण्यासाठी मागील २ वर्षांपासून ११वी आणि १२वीचे प्रवेशही ऑनलाइन पद्धतीने करण्याचा विचार चालू होता. मात्र शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय अखेर बारगळला आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा ऑफलाइन प्रवेश होणार असल्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

केवळ खालील अपवादात्मक विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत;
१. पालकांची बदली होणे
२. सध्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेले महाविद्यालय घरापासून लांब असणे
३. विद्यार्थ्यांचा राहण्याचा पत्ता बदलणे
४. वैद्यकीय कारणास्तव परिसरात कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळणे
५. शाखा बदलून मिळणे
६. बारावीमध्ये विद्यार्थ्याला बोर्ड बदलण्याचा असल्यास

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)#Vinod Tawde(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या