28 April 2024 1:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Health First | जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात ७ मोठे फायदे | नक्की जाणून घ्या

Jeera water, Health benefits, Healthy life, health Fitness

जीरा पाणी हे काही सामान्य पाणी नाही हे एक प्रकारचे औषधी आहे. यामुळे आरोग्याला अनेक लाभ मिळतात. जीरा पाणी (Cumin, or zeera) बहुतेक वेळा वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. त्याच सोबत याचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. प्रत्येक घरामध्ये स्वयपाक घरामध्ये जीरा वापरतात. जीरा टाकून केलेले पदार्थ जास्त स्वादिष्ट बनतात. जीरे पदार्थात आवश्य वापरले पाहिजे कारण यामुळे पाचनतंत्र सुधारण्यास मदत मिळते.

जीरे सुगंधी असते आणि याची चव देखील वेगळीच असते. जिरे पाणी पिण्यामुळे वजन कमी होते त्याच सोबत अनेक फायदे मिळतात. चला पाहू जीरा पाणी पिण्याचे कोणकोणते फायदे आहेत.

बद्धकोष्ठता :
जीऱ्याचे पाणी पोटाच्या संबंधित कोणतेही आजार दूर करण्यासाठी मदत करतात. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास जीरा पाणी पिण्यामुळे अपचन आणि पोटाच्या संबंधित आजारामध्ये आराम मिळतो. असे मानले जाते कि जीरा आपल्या पाचन तंत्राला बुस्ट करतो. आणि पचन संबंधित समस्या दूर करतो.

वजन कमी करतो :
जीऱ्यामध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट आणि पोषक तत्व चयापचय वाढवते. जीरा आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर काढते. ज्यामुळे शरीरातून चरबी कमी होते.

हार्ट अटैकचा धोका कमी करतो :
जीरा पाणी शरीरातील फैट आणि कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करतो. कोलेस्ट्रोलची कमी हार्ट अटैकचा धोका कमी करण्यास मदत होते.

मासपेशीच्या वेदना पासून आराम :
जीरा पाणी शरीरातील रक्त संचार वाढवतो. यामुळे मासपेशीच्या वेदना कमी होतात. आणि शरीर थकण्या पासून वाचवतो.

इम्यूनिटी सिस्टम मजबूत करतो :
रोग प्रतिकारकशक्ती मजबूत असेल तरच आजारा पासून बचाव होतो. जीऱ्याच्या पाण्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते. आयर्न आपली रोग प्रतिकारकशक्ती मजबूत करते. याच सोबत जीऱ्यामध्ये विटामिन ए आणि सी असते. यामुळे इम्युनिटी लेवल वाढते.

एनीमिया दूर करण्यास मदत करते :
रक्ताची कमी एनिमिया रोग असतो. याचा उपाय जीऱ्याच्या पाण्याने केला जाऊ शकतो. जीऱ्यामध्ये आयरन भरपूर असते ज्यामुळे हिमोग्लोबिन संतुलित ठेवण्यास मदत होते. यामुळे एनिमियाची समस्या देखील दूर होऊ शकते. जर शरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर नियमितपणे जीऱ्याचे पाणी सेवन करावे.

झोपेची समस्या दूर करतो :
झोपेची समस्या वजन वाढल्यामुळे होते. वजन वाढल्यावर झोपेची समस्या होणे सामान्य आहे. जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या होत असेल तर जीऱ्याचे पाणी सेवन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

 

News English Summary: Cumin or zeera, is an integral part of a majority of our curries and stews. According to the book ‘Healing Foods’, cumin is rich in anti-inflammatory antioxidants, and is also known to be antibacterial and antiseptic. It can solve a host of your tummy woes, fortify digestive tract, relieve nausea, and bloating and constipation. Starting your day with a glass full of jeera water, according Bangalore-based Nutritionist experts could prove to be game changer for you in terms of health and weight loss. Benefits of jeera water makes it one of the healthiest drinks ever known. To make jeera water at home, all you need to do is boil a few seeds of jeera (cumin) in water, then allow it to cool and drink it early in the morning on an empty stomach.

News English Title: Jeera water benefits for healthy life health article.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x