एकनाथ खडसेंच्या वृत्तानंतर भाजपकडून पुन्हा सत्तांतराच्या पुड्या?

मुंबई, ९ ऑक्टोबर : महाराष्ट्रातील सध्याचे सरकार कोण चालवतेय, कुठून चालतंय हे काहीही कळत नाही. हे सरकार घरी पाठविण्यासाठी निशाणा साधण्याची वेळ आली असून सत्तेतील सध्याचे तिन्ही पक्ष विरोधी पक्षात दिसतील आणि भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असे भाकित भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी वर्तविले. महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यसमितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते.
नड्डा म्हणाले की, राज्यातील जनतेला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून हवे होते, त्यांनी तसा कौलही दिला होता. पण राजकारणात कधी कधी धोका होतो. तो धोका राज्यातील जनतेसोबत झाला. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या सत्तेत असलेले तिन्ही पक्ष येणाऱ्या काळात तुम्हाला नेहमीसाठी विरोधी पक्षात दिसतील.
काँग्रेस, राष्ट्रवादीने शेतकरी कायद्यांना केलेल्या विरोधाचा समाचार घेताना ते म्हणाले, शरद पवार यांनी आधी शेतकरी कायद्याचे समर्थन केले तर ते चांगले आणि मोदींनी ते मंजूर केले तर मोदी देशद्रोही कसे? काँग्रेसने आधी कायद्यांचे सूतोवाच केले आणि आता मोदींनी कायदे केल्यानंतर तेच आज ट्रॅक्टर जाळून निषेध करत आहेत. हा सरळसरळ बेगडीपणा आहे, असेही नड्डा म्हणाले.
दरम्यान, भाजपमधील मोठे नेते सध्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याने पक्षात पुन्हा नैराश्येचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून भाजपाचे दिल्लीतील वरिष्ठ नेते सुद्धा अंतर्गत बंड थोपविण्यासाठी आधीच सत्तांतराचा पुड्या सोडत असल्याचं राजकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात ३ अनुभवी पक्षातील अनुभवी दिग्गज नेते एकत्र असल्याने महाविकास आघाडी सरकार पाडणं मोदी-शहांना सुद्धा शक्य नसल्याचं म्हटलं जातं आहे. त्यात राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील भाजपाची सत्ता सम्पुष्टात आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून त्यात पहिला नंबर सोलापूरचा असले असं म्हटलं जातंय. परिणामी भाजपचे राज्यातील नेते देखील आमदारांना कसं थोपायचं या चिंतेत पडले आहेत.
News English Summary: It is not known who is running the present government in Maharashtra and where it is coming from. It is time to aim to send this government home and all the three parties in power will be in the opposition and the BJP will come to power on its own, predicted BJP national president J.P. Reported by Nadda. He was guiding the Maharashtra Pradesh BJP working committee meeting.
News English Title: BJP National President JP Nadda says BJP will soon come to power in Maharashtra Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH