3 May 2024 10:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह संविधानविरोधी....रामदास आठवले | वाद पेटणार?

Insistence of Marathi language,  In Maharashtra, Unconstitutional, Union Minister Ramdas Athavale

मुंबई, ९ ऑक्टोबर : महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह करणे संविधानविरोधी असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रामदास आठवलेंच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कुलाबा येथील ‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केल्याने मराठी लेखिका शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर २० तास ठिय्या आंदोलन केले. यानंतर आंदोलनस्थळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दुकानदाराला मनसे स्टाईल दणका दिला. परंतु, रामदास आठवले यांनी लेखिका शोभा देशपांडे यांच्या मतांशी सहमत नसल्याचे म्हंटले आहे.

महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह करणे संविधानविरोधी आहे. प्रत्येक व्यक्तीला आपली भाषा बोलण्याचा अधिकार आहे. लेखिका शोभा देशपांडे यांच्या मतांशी मी सहमत नाही, असे रामदास आठवलेंनी म्हंटले आहे. मराठा आरक्षणाविषयी बोलताना एक राजा तर बिनडोक असल्याची टीका वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी नामोल्लेख न करता खा. उदयनराजे यांच्यावर केली होती. यावर बोलताना रामदास आठवले यांनी छत्रपतींना बिनडोक म्हणणे योग्य नसल्याचे म्हंटले आहे.

मराठा आरक्षणाला अडचण असल्याने एमपीएससी परीक्षा रद्द करू नये. एमपीएससी परीक्षा झालीच पाहिजे, अशीही भूमिका आठवलेंनी मांडली आहे. तसेच, बिहार निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना ५० उमेदवार उतरवणार आहे. परंतु, बिहारमध्ये शिवसेनेची ताकद नसल्यामुळे भाजपाला त्याचा फटका बसणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

News English Summary: Union Minister of State Ramdas Athavale has expressed the view that insisting on Marathi language in Maharashtra is unconstitutional. Ramdas Athavale’s statement is likely to spark a new controversy.

News English Title: Insistence of Marathi language in Maharashtra is unconstitutional Union Minister Ramdas Athavale Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x