6 May 2024 12:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

TRP Scam | रिपब्लिक टीव्हीसाठी पैसे पुरविणाऱ्याला पोलीस कोठडी

Mumbai Police, Fake TRP Scam, Republic TV, Arnab Goswami

मुंबई, १८ ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी त्याबाबत अधिकृत माहिती दिली होती.

ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन मुंबई पोलीस आयुक्तांची प्रतीमा मलिन करण्यासाठी शिस्तबद्ध कँपेन चालविण्यात आलं होतं. विशेष त्यांच्याविरोधात अश्लाघ्य भाषेचा वापर केला आणि मुंबई पोलीस दलाला बदनाम करण्याची मोठी योजना सातत्याने राबवली गेल्याच पाहायला मिळालं होतं. सदर प्रकरणी आयटी कायद्याअंतर्गत अनेक सोशल मीडिया अकाऊंट आणि बनावट अकाऊंटवर गुन्हे दाखल केले गेले, अशी माहिती रश्मी करंदीकर यांनी दिली होती आणि तिथेच डिजिटल गुन्हेगारांचे धाबे दणाणले.

त्यानंतर मुंबई पोलिसांनी TRP घोटाळा उघडकीस आणला होता आणि संबंधित टीव्ही वृत्तवाहिन्यांचे धाबे दणाणले होते. दरम्यान, रिपब्लिक टीव्ही पाहण्यासाठी पैसे पुरविणाऱ्या उमेश मिश्राला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तो ‘हंसा’चा माजी कर्मचारी असून त्याला शुक्रवारी मुंबई गुन्हे गुप्त वार्ता विभागाने (सीआययू) विरार येथून अटक केली होती. वादग्रस्त रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन स्थानिक चॅनेल्सनी जाहिराती मिळविण्यासाठी टीआरपी रॅकेटमधून कोट्यवधीचा महसूल जमविल्याचे मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले. रिपब्लिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संपादक अर्णब गोस्वामी व इतरांची या प्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत हंसा कंपनीचा विशाल वेद भंडारी (२१), अंधेरीतील बोमपेली नारायण मिस्त्री (४४), बॉक्स सिनेमाचे नारायण नंदकिशोर शर्मा (४७), फक्त मराठीचे शिरीष सतीश पत्तनशेट्टी (४४) आणि उत्तर प्रदेशमधून विनय त्रिपाठीला अटक करण्यात आली आहे. मिश्रा याच्या अटकेनंतर पोलिसांकडून आता दिनेश विश्वकर्मा, रॉकी व अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

 

News English Summary: The TRP scam was exposed by the Mumbai Police and the relevant TV news channels were cracked. Meanwhile, Umesh Mishra, who paid to watch Republic TV, was remanded in police custody for two days. He is a former employee of Hansa and was arrested by the Mumbai Criminal Intelligence Service (CIU) from Virar on Friday. Mumbai police have revealed that the controversial Republic TV and two other local channels have amassed crores of rupees from the TRP racket to get advertisements. Republican chief executive officer and editor Arnab Goswami and others will be questioned in the case, investigators said.

News English Title: Police custody of the person who provided money for Republic News updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x