10 May 2024 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स Bonus Shares | कमाईची मोठी संधी! सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, मल्टिबॅगर स्टॉक खरेदी करा Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉक डाऊनसाईड झोनच्या दिशेने? ब्रेकआऊट तोडल्यास रु.400 पार Patel Engineering Share Price | शेअर प्राईस 55 रुपये! स्वस्त शेअरला तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, स्टॉक तेजीत धावणार IPO GMP | आला रे आला IPO आला! ग्रे मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell? Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरने ब्रेकआउट तोडला, अल्पावधीत देणार मोठा परतावा, खरेदीचा सल्ला
x

जेडीएस - काँग्रेस युती, कर्नाटक लोकसभा निवडणुकीत भाजपला धोका ?

कर्नाटक : २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत जेडीएस – काँग्रेस युती उदयास येऊन भाजपला मोठा धोका उद्भवण्याची शक्यता राजकीय जाणकार बोलून दाखवत आहेत ते सुद्धा मागील आणि सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार.

कारण जर आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व देवेगौडा यांचा जनता दल सेक्यूलर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर भाजपाला केवळ ६ जागांवरच विजय मिळेल असं सध्याची आकडेवारी सांगते. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला १७ जागांवर विजय मिळाला होता.

कालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलर या दोन पक्षांची जवळीक वाढल्याचे चित्र असून त्याचे रूपांतर येत्या लोकसभा निवडणुकीत युतीत होण्याची शक्यता आहे. परंतु ह्या दोन पक्षांची युतीच भाजपसाठी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत धोक्याची घंटा ठरू शकते. काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलर यांची युती झाल्यास भाजपच्या वाट्याला कर्नाटक लोकसभेत केवळ ६ जागाच विजय मिळवता येईल हे आकडेवारी सांगते.

काल हाती आलेल्या विधानसभेच्या निकालाच्या निकषावर काही वृत्त पत्रांनी भाजपाला २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळू शकतात याचा एक अंदाज घेतला तेव्हा ही आकडेवारी समोर आली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यामुळे २०१९ मध्ये जर जेडीएस आणि काँग्रेस एकत्र आले तर मतांचे विभाजन होणार नाही आणि त्याचा प्रचंड मोठा फटका भाजपाला २०१९ मध्ये बसेल असं आकडेवारी सांगते.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x