3 May 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा? IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा
x

भाजपची सत्ता गेली की त्यांची सुद्धा चौकशी होणार: राज ठाकरे

कोंकण : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून सर्वच पक्षाकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने थेट राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप केला असून भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

कर्नाटक मध्ये नक्की कोणाची सत्ता येणार हे अनिश्चित झाले असले तरी भाजप सत्तेचा दूर उपयोग करून काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना करोडो रुपयांचे आमिष दाखवून त्यांच्या पक्षातून फोडण्याचा प्रयत्नं करत आहे असा आरोप विरोधी पक्ष थेट पत्रकार परिषद घेऊन सांगत आहेत.

कर्नाटकचे विद्यमान राज्यपाल हे नरेंद्र मोदींचे गुजरातमधील जुने सहकारी असल्याने तिथे पक्षपातीपणाचा आरोप करण्यात येत असून त्यालाच अनुसरून जेंव्हा कोकण दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘कर्नाटकचे राज्यपाल हे भाजपच्याच बाजूने जाणार’ असे मत त्यांनी मांडले आहे. पुढे ते म्हणाले की, भाजप केवळ सत्तेचा दुरुपयोग करत आहे. सत्ता आहे म्हणून भाजपाने दुरुपयोग करू नये. भविष्यात भाजपाची सुद्धा वेळ येणार आहे. सत्ता गेल्यावर त्यांचीही चौकशी होणार असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x