10 May 2025 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली Horoscope Today | 11 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 11 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | खुशखबर! मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये, जोरदार तेजीचे संकेत - NSE: RPOWER NBCC Share Price | 28 टक्के कमाईची संधी मिळतेय, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

Good News | राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांच्या पुढे

Maharashtra, Covid 19, Corona Virus, Recovery rate

मुंबई, २ नोव्हेंबर: महाराष्ट्र आज संपूर्ण दिवसभरात एकूण १०४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर, ४,००९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा तसेच कोरोना मृतांचा आकडा जलदगतीने खाली येताना दिसत आहे जे सकारात्मक म्हणावं लागेल. मागील तब्बल ७ महिन्यांपासून कोरोनानं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर थैमान घातलं होतं, पण आता हळूहळू स्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे असं आकडेवारी सांगते.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीच्या एकूण संख्येवर नियंत्रण मिळविण्यात राज्यातील आरोग्य यंत्रणेला यश प्राप्त होतं असल्याचं दिसत आहे. आजही तब्बल एकूण १०,२२५ रुग्णांना इस्पितळातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलं. आकडेवारीनुसार आजपर्यंत एकूण १५,२४,३०४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याचं आकडेवारी सांगते. प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्याचा रिकव्हरी रेट आता ९०.३१ टक्क्यांवर पोहोचला आहे आणि राज्य सरकारसाठी अत्यंत सकारात्मक तसेच आत्मविश्वास वाढविणारी गोष्ट आहे.

त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना मोठं यश येत असल्याचं सध्याची आकडेवारी सांगते. विशेष म्हणजे लोकांच्या मनातील भीती देखील कमी झाली असून पाहिल्याप्रमाणे कोरोना झाला तरी अनेक रुग्णांमध्ये भीती दिसत नाही, जे सकारात्मक म्हणावं लागेल.

 

News English Summary: A total of 104 corona patients have died in Maharashtra today, while 4,009 new cases have been reported. In Maharashtra, the number of corona outbreaks and corona deaths is declining rapidly, which is a positive thing. For the last 7 months, Corona had been investing heavily in Maharashtra, but now the situation is slowly returning to normal, according to statistics.

News English Title: Maharashtra Covid 19 recovery rate reached to 90 percent News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या