तिला कसलीच लाज नाही | कोणाच्या जिवावर माज करतात | अलका कुबल संतापल्या
मुंबई, २ नोव्हेंबर: सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ मालिका सध्या लोकांच्या आवडीची झाली आहे. अलका कुबल यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत तरुण अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड देखील प्रसिद्धीच्या पहिल्या टप्प्यातच वादात आल्याने भविष्यात तिच्या एकूण प्रोफेशनवर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी घटना घडली आहे.
कारण ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला काढून टाकण्यात आल्याचं धक्कादायक वृत्त आहे. निर्मात्यांनी वेळ घेत निर्णय घेतला असला तरी त्यांचा व्यावसायिक संयम सुटल्याने त्यांना असा निर्णय घेणं भाग पडलं आहे. तिच्या जागी आता मराठी बिग बॉसमध्ये घरा घरात पोहोचलेल्या वीणा जगताप हिची वर्णी लागली आहे.
दरम्यान, प्राजक्ताला तडकाफडकी मालिकेतून का काढावं लागलं याची संपूर्ण माहिती निर्मात्या अलका कुबल यांनी राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे प्राजक्ताला काढून टाकण्या इतपत नव्हे तर तिच्यावर अनेक आरोप देखील निर्मात्या अलका कुबल यांनी मुलाखतीत केलं आहेत. अलक कुबल यांच्या आरोपांमुळे भविष्यत इतर निर्माते देखील त्यांच्या मालिकांपासून प्राजक्त गायकवाडला दूर ठेवणं पसंत करतील अशी शक्यता आहे.
सदर मुलाखतीत आरोप करताना अलका कुबल यांनी सेटवरील सम्पुर्ण कथनच केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांच्या आरोपानुसार, सेटवर आल्यावर प्राजक्ताचे सतत नखरे इतर कलाकारांना सहन करावे लागायचे. शूटिंगच्या वेळेत मध्येच तिचं डोकं दुखतं असल्याचं म्हणायची, तर कधी मध्येच सम्पुर्ण शूटिंग थांबवायला सांगायची, तर मध्येच रडत बसायची असे प्रकार वारंवार घडायचे. अनुभवी कलाकार शरद पोंक्षे आणि मालिकेतील इतर वरिष्ठ कलाकारांनी मला अनेकदा प्राजक्ताला मालकीतून काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. पण तरी मी तिला समजून घेण्याचाच प्रयत्न केला होता”, असं त्यांनी सांगितलं.
प्राजक्ता कधी कधी तब्बल ६ तास रुममधून बाहेर नसे. “सगळे कलाकार बराच वेळ तिची सेटवर वाट पाहत बसायचे. आशालता यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार देखील तिच्यासाठी थांबायच्या हे दुर्दैव म्हणावं लागेल. मात्र तिला कसलीच लाज नाही आणि चेहऱ्यावर लवलेशही दिसायचा नाही. उलट सेटवर सगळ्यांना दम देणे, वारंवार नखरे करणे हे तिचं नित्याने सुरूच असायचं. तिच्यामुळे नाइलाजाने आम्हाला रात्री शूट करण्याची वेळ यायची. पण या कलाकारांमध्ये एवढी हिंमत कुठून येते, कोणाच्या जिवावर माज करतात”, अशा शब्दांत अलका कुबल मुलाखतीत संतापल्याच पाहायला मिळालं.
विशेष म्हणजे प्राजक्ताला समज देऊन दुसऱ्यांदा संधी देण्यात आली होती. परंतु त्यानंतर सुद्धा तिच्या एकूण वागणुकीत कोणताही फरक दिसला नाही आणि अखेर तिला मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचं अलका यांनी स्पष्ट केलं.दरम्यान, प्राजक्ताचं हेकेखोर वागणं तिच्या अंगाशी आल्याची प्रतिक्रिया अनेकजण समाज माध्यमांवर व्यक्त करत आहेत.
News English Summary: The TV series ‘I Mazhi Kalubai’ on Sony Marathi channel has become popular now. The series, starring Alka Kubal in the lead role, has also sparked controversy among young actress Prajakta Gaikwad in the first phase of her fame, which could affect her overall career in the future. Because it is shocking news that actress Prajakta Gaikwad has been removed from the series ‘I Majhi Kalubai’. Although the decision was taken by the producers in time, they have been forced to make such a decision due to lack of professional restraint. She has been replaced by Veena Jagtap, who has now reached home in Marathi Bigg Boss.
News English Title: Actress Prajakta Gaikwads unprofessional attitude forced us to axe her from Aai Mazi Kalubai says producer actress Alka Kubal News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा