29 April 2024 4:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

सोलापूर महापालिकेत मलईदार पदांसाठी सेना-भाजपचं मिलन

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेचे एकमेकांशी जरा सुद्धा पटत नसताना ते महापालिकेच्या ७ विषय समिती सभापती निवडणुकीसाठी व मलईदार पदांसाठी एकत्र आले व आपसातील रुसवे फुगवे बाजूला ठेवले. विशेष म्हणजे विरोधकांना अंधारात ठेवून शिवसेनेचं आणि भाजपचं मनोमिलन झालं आहे.

शिवसेनेने आणि भाजपने एकत्र येऊन लढल्यामुळे समितीच्या सभापती पदाच्या ४ जागा भाजपच्या पदरात पडल्या तर शिवसेनेच्या वाट्याला ३ जागा आल्या आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपाने या निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने सर्व जागा बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा स्वतः पीठासन अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केली.

अखेर मलईदार पद पदरात पडल्यावर पालिकेचा कारभार चांगला आणि नेटका करणार असल्याचे स्वतः उपमहापौरांनी सांगितल आहे. त्यामुळे वर्षभरापासून सुरु असणारे वाद पालिकेतील मलईदार पदांच्या निवडणुका आल्या की कसे काय मिटतात असा प्रश्न स्थानिक जनतेला पडला आहे.

सोलापूर महानगरपालिकेतील एकूण ७ सात विषय समिती सभापती पैकी,

१. स्थापत्य समितीसाठी – गुरूशांत धुत्तरगांवकर (शिवसेना),
२. शहर सुधारणा समितीसाठी – शालन शिंदे (भाजप)
३. वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीसाठी – वरलक्ष्मी पुरूड, उद्यान, (भाजप)
४. मंड्या समितीसाठी – कुमूद अंकाराम (शिवसेना)
५. विधी समितीसाठी – विनायक कोंड्याल (शिवसेना)
६. कामगार व समाजकल्याण समितीसाठी रवी कैय्यावाले (भाजप)
७. महिला बालकल्याणसाठी रामेश्वरी बिर्रू (भाजप)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x