7 May 2024 3:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

एका व्यक्तीच्या लाडापोटी आम्हाला बाजूला केलं | त्याच व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं

Donated, Chief Minister ship Brahmin, NCP Leader Eknath Khadse

जळगाव, ९ नोव्हेंबर: राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला असला तरी फडणवीसांवर त्यांचे राजकीय हल्ले सुरूच आहेत. यापूर्वी त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांच्यामुळे भारतीय जनता पक्ष सोडल्याचे देखील म्हटले होते. तसेच फडणवीस यांनी कसे खालच्या पातळीचे राजकरण केले याचा पाढा पत्रकार परिषदेत वाचला होता.

मात्र खडसे यांनी पुन्हा हल्लाबोल करत फडणवीसांना लक्ष केलं आहे. एका जाहीर कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी व वादातील पूर्ण कथनच करताना ते वाक्य म्हणाले की, ‘मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिलं,”. मुक्ताईनगर येथे एका जाहीर कार्यक्रमात ते उपस्थितांशी संवाद साधत होते.

“नाथाभाऊ इतका दिलदार आहे की, आम्हाला सांगितलं गेलं नाथाभाऊ तू आता घरी बैस मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. नाथाभाऊवर मुक्ताबाईचा आशिर्वाद आहे, त्यामुळे मी म्हटलं घे रे तू भी क्या याद करेगा. मी भल्या भल्यांना दान देतो तर ब्राह्मणांना दान द्यायला काय हरकत आहे,” अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

आपण भारतीय जनता पक्ष का सोडली याच कारण सांगताना खडसे म्हणाले, “भारतीय जनता पक्षानं एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं. एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. या अशा लोकांमुळे मला भारतीय जनता पक्षा सोडवी लागली. जिथे आपलेच गद्दार होतात त्या घरात राहून काय उपयोग आहे. यांच्यापेक्षा दिलदार शत्रू बरा. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पक्षाला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसानं छळलं” अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील खंत पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे.

 

News English Summary: Though NCP leader and Legislative Council candidate Eknath Khadse has slammed the BJP, his political attacks on Fadnavis continue. Earlier, he had said that he had left the Bharatiya Janata Party because of Leader of the Opposition Devendra Fadnavis. He also read about how Fadnavis did low level politics at the press conference. However, Khadse has attacked Fadnavis again. Interacting with the audience at a public event, he and the full narrator of the controversy said, “I donated the chief ministership to a Brahmin.”

News English Title: I donated Chief Minister ship Brahmin said NCP Leader Eknath Khadse News updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x