4 May 2024 10:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

डॉक्टरांचा सोनिया गांधींना हवापालटाचा सल्ला | काही दिवस गोव्यात वास्तव्य

Doctors advise, Sonia Gandhi, Out from Delhi, Pollution Issue

पणजी 20 नोव्हेंबर: काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आज गोव्यात दाखल झाले. दिल्लीतली हवेची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी हवापालटाचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे ते गोव्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोनिया गांधी यांना दम्याचा त्रास होतो. त्याच बरोबर छातीमध्ये इन्फेक्शनही झालं आहे. त्यामुळे दिल्लीत्या हवेत आजार बळावण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्यामुळे काही दिवस दिल्लीबाहेर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

बिहारच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षातही अंतर्गत बंडाळी सुरु झाल्या आहेत. कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला घरचा अहेर देत, बिहारचा पराभव ही आपल्याला सामान्य बाब वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांना सलमान खुर्शीद आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कपिल सिब्बल यांना खडे बोल सुनावले होते. काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळ्या सुरु असताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी दिल्ली सोडली आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा पडणार का? की हा अंतर्गत वाद आणखी वाढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

यापूर्वी जुलै महिन्यात सोनिया गांधी यांना प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेव्हापासून सोनिया गांधी यांना छातीमधील संसर्गाची समस्या जाणवत आहे. यासाठी सोनिया गांधी सध्या औषधांचा हेवी डोस घेत आहेत. सप्टेंबर महिन्यात त्या वैद्यकीय तपासणीसाठी परदेशातही जाऊन आल्या होत्या. तेव्हादेखील राहुल गांधीही त्यांच्यासोबत होते.

मात्र, यामुळे राहुल गांधी यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहता आले नव्हते. याच काळात भाजपने संसदेत कृषी विधेयके मंजूर करवून घेतली होती. या विधेयकांना काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. मात्र, अशा महत्त्वाच्या प्रसंगी राहुल गांधी संसदेत उपस्थित नसल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.

 

News English Summary: Congress interim president Sonia Gandhi and her son and party leader Rahul Gandhi arrive in Panaji. Doctors had earlier advised Sonia Gandhi to spend time in a less polluted place

News English Title: Doctors advise Sonia Gandhi to move out from Delhi due to pollution News updates.

हॅशटॅग्स

#Delhi(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x