18 April 2024 5:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 4 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 33 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा Lorenzini Apparels Share Price | 27 रुपयाच्या शेअरची कमाल, मल्टिबॅगर परताव्यसह स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा लाभ Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याची बातमी, सकारात्मक तेजीचे संकेत Stocks To Buy | अल्पवधीत मालामाल होण्याची संधी, हा शेअर देईल 35 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
x

Nagrota encounter | २६/११ हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला

Terrorists Attack, Nagarota, Planned major attack

नवी दिल्ली 20 नोव्हेंबर: जम्मू काश्मीरमध्ये नगरोटा इथे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. या घटनेचं वृत्त सगळीकडे प्रसिद्ध झालं. पण नगरोटा इथे मारले गेलेले दहशतवादी काही ठराविक उद्देशाने सीमेपलीकडून भारतात घुसवण्यात आले होते, याबद्दलचा मोठा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या एका बैठकीत करण्यात आला. नगरोटाची घटना बॉर्डर ग्रीड रणनीचं (Border Grid) यश मानलं जात आहे. हे अतिरेकी तिथे मारले गेले नसते तर देशात त्यांनी हाहाकार उडवला असता.

गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नगरोटा परिसरात सुरक्षा वाढवली आणि प्रत्येक नाक्यावर गाड्यांची जबरदस्त तपासणी केली गेली. या दरम्यान श्रीनगर जम्मू महामार्गावर सकाळी ४.२० वाजताच्या सुमारास काश्मीरच्या दिशेने जाणारा एक ट्रक जवानांनी ताब्यात घेऊन तपासणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तपासणीदरम्यान ट्रक चालक उतरून पळाला.

चकमकी संदर्भात काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी पत्रकारांना माहिती दिली की, “गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याचा प्रयत्न करुन आगामी निवडणुकांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जम्मू पोलीस आणि सुरक्षा दलाने चारही दहशतवाद्यांचा खात्मा करुन एक चांगले काम केले आहे.”

नियंत्रण रेषेच्या पलिकडून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येबाबत विचारल्यावर आयजीपी यांनी म्हटलं, अशी माहिती समोर आली आहे की, जवळपास २५० दहशतवादी सीमेपलीकडे आहेत. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचे कट उधळून लावण्यासाठी सुरक्षा दल सक्षम आहे.

 

News English Summary: Four militants were killed in a clash with security forces at Nagarota in Jammu and Kashmir. News of this incident spread everywhere. But the terrorists who were killed in Nagarota were infiltrated into India from across the border for a specific purpose, a major revelation was made at a meeting chaired by Prime Minister Narendra Modi. The Nagarota incident is considered a success of the Border Grid Strategy. Had these terrorists not been killed there, they would have wreaked havoc in the country.

News English Title: Terrorists Nagarota were planned for major attack News updates.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x