13 February 2025 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | महिना 40 हजार पगार असणाऱ्या खाजगी पगारदारांच्या खात्यात 3,46,154 रुपये जमा होणार, अपडेट जाणून घ्या 8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार, रक्कम जाणून घ्या Salary Vs Savings Account | 90% लोकांना माहिती नाही सॅलरी अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमधील फरक, व्याजदर ते मिनिमम बॅलन्स अटी पहा Tax Exemption on HRA | पगारदारांनो, तुमचा HRA वर टॅक्स सवलत मिळणार का, कसा फायदा होईल समजून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त बचत करा या SBI फंडाच्या योजनेत, महिना 2500 रुपये एसआयपीवर 1.18 कोटी रुपये मिळतील SBI Home Loan | नोकरदारांना SBI बँकेकडून 35 लाखांचे गृहकर्ज हवे असल्यास महिना किती पगार असावा, योग्य माहिती जाणून घ्या Gratuity Money Alert | खाजगी पगारदारांसाठी 25 लाखांपर्यंत ग्रॅच्युईटी वाढली, तुमच्या खात्यात किती रक्कम जमा होईल इथे पहा
x

भारताला चीनपेक्षा आधिक शक्तीशाली व्हावं लागेल - मोहन भागवत

India China, Ladakh, RSS, Mohan Bhagwat

नागपूर, २५ ऑक्टोबर : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या संघटनांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर होणारे कार्यक्रम अतिशय थोड्याथोडक्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेतला. सावधगिरी बाळगत घेण्यात आलेल्या याच निर्णयाच्या धर्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सवही यंदाच्या वर्षी रेशीमबागेऐवजी महर्षी व्यास सभागृहात पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.

नागपूरात हा सोहळा पार पडत असून, याकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे. यंदाच्या वर्षी संघाच्या पारंपरिक सोहळ्याचं चित्र पाहता येणार नसलं तरीही, सरसंघचालक मोहन भागवत यांनी मात्र ऑनलाईन माध्यमातून स्वयंसेवकांना आणि देशाला मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी राम मंदिरापासून सीएएपर्यंत आणि देशातील कोरोना स्थितीपर्यंतसुद्धा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला. सीएएला काहींनी विरोध केला, पण यामुळं कोणाचंही नागरिकत्व मात्र धोक्यात आलेलं नाही असं मोहन भागवत म्हणाले. तर, राम जन्मभूमीचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा या निर्णयाचं स्वागत केलं.

चीनविरोधात केंद्र शासनाने घेतलेल्या भूमिकेची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी प्रशंसा केली आहे. चीनच्या राक्षसी महत्वाकांक्षेवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे व त्यासाठी आर्थिक क्षेत्रात, सामरिक क्षेत्रात, अंतर्गत सुरक्षा तसेच सीमा सुरक्षा व्यवस्थांमध्ये, शेजारी देशांसोबत तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये चीनहून मोठे स्थान प्राप्त करणे हाच एकमेव उपाय असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

चीनने या अगोदरदेखील वेळोवेळी जगाला आपल्या विस्तारवादी मनोवृत्तीची ओळख दिली आहे. आर्थिक क्षेत्रात, सामरिक क्षेत्रात, आपली अंतर्गत सुरक्षा तसेच सीमा सुरक्षा व्यवस्थांमध्ये, शेजारी देशांसोबत तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये चीनहून मोठे स्थान प्राप्त करणे हाच त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेवर नियंत्रणाचा एकमेव उपाय आहे. या दिशेने आपल्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांची पावलेदेखील पडत आहेत, असे दिसून येते. श्रीलंका, बांगलादेश, ब्रह्मदेश, नेपाळ हे आपले शेजारी देश, जे आपले मित्रदेखील आहेत व मोठ्या प्रमाणात समान प्रकृतीचे देश आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला आणखी मित्रत्वाचे संबंध करण्याबाबत वेग वाढविला पाहिजे. या कार्यात अडथळे उत्पन करणारे मतभेत, मतांतरे, वाद इत्यादी मुद्दे त्वरित दूर करण्याचे आणखी प्रयत्न करावे लागतील, अशी अपेक्षा सरसंघचालकांनी व्यक्त केली.

 

News English Summary: The entire world has witnessed how China is encroaching into India’s territory. Everyone is aware of China’s expansionist behaviour. China is fighting with many countries-Taiwan, Vietnam, U.S, Japan & India. But India’s response has made China nervous said RSS Chief Mohan Bhagwat.

News English Title: China was first introduced to the valor of the Indian Army says RSS Chief Mohan Bhagwat News Updates.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x