2 May 2024 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा
x

तू ज्यांचा भक्त आहेस | त्या पक्षाच्या व्यक्तीने मराठी कलाकारांची लायकी काढलेली तेव्हा तू....

Mahesh Tilekar, Aroh Velankar, Amruta Fadnavis, BJP Party

मुंबई, २१ नोव्हेंबर: भाऊबीजेचे औचित्य साधून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी ‘तिला जगू द्या’ (Tila Jagu Dya) हे गाणे सोशल मिडियावर प्रदर्शित केले. अमृता फडणवीसांच्या आवाजातील या गाण्यावर अनेकांनी टिका केली तर अनेकांनी कौतुक देखील केले. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर टिका करत अमृता फडणवीस यांना खडे बोल सुनावले. तिला गाऊ नको द्या असे म्हणत त्यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट केली.

यावर अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Velankar) यांनी टिका करत मराठी तारका सारखा कार्यक्रम करणारे तुम्ही एका स्त्री बद्दल कसली भाषा करत तुमची पोस्ट वाचून लाज वाटली असे फेसबुकला पोस्ट केली आहे. आरोहच्या या टिकेला महेश टिळेकर यांनी देखील सडकून टिका केली आहे. . “जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश देतोय, तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथ, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू धमकी देऊन,” असं महेश टिळेकर म्हणाले.

आरोहच्या या टीकेला टिळेकर तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना महेश टिळेकर म्हणाले की, ‘मराठी कलाकारांची लायकी ट्रेननं फिरण्याची आणि गाय छाप तंबाखू खाण्याची आहे असं विधान तू ज्यांचा भक्त आहेस त्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीने केले होते, तेव्हा तुझे रक्त का उसळले नाही? तेव्हा कलाकारांची बाजू घेऊन बोलायला पुढं का आला नाहीस? कुठं पिऊन पडला होतास की शेपूट घालून बसला होतास? तुझं वय जितकं आहे ना तितकी माझी कारकीर्द आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, मराठी भाषा, महापुरुषांचा, महाराष्ट्राचा, मुंबई पोलिसांचा अपमान इतर कलाकार करत होते, तेव्हा तू आईच्या पदराआड लपला होतास की मूग गिळून गप्प बसला होतास? स्त्री सन्मान आणि कला सन्मान यातला आधी फरक ओळखायला शिक. जे बेसूर आहे त्याला अमृतवाणी समजून डोक्यावर घेणाऱ्यातला मी नाही. ‘पुण्यात हनुमंत गायकवाड यांच्या ऑफिसमध्ये भेटून माझ्याकडे काम मागत होतास, ते विसरलास का? जिथं बोलायचं तिथंच मी बोलतो आणि तुझ्यात खरी हिंमत असेल तर समोर येऊन धमकी दे. माझी पोस्ट वाचून जी आग आणि धूर बाहेर येत आहे तो तुझ्या शरीरातील नेमका कोणत्या अवयावामधून येतोय ते पाहून तुझं बिन टाक्याचे ऑपरेशन करायचे की टाके घालून ते मला ठरवता येईल, असं आव्हानच टिळेकर यांनी आरोह वेलणकरला दिलं आहे.

Aroh Velankar बेसूर ,गाणारी स्वयंघोषित गायिका, जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश…

Posted by Mahesh Tilekar on Friday, November 20, 2020

 

News English Summary: Actor Aroh Velankar has posted on Facebook that he was ashamed to read your post about a woman who is doing programs like Marathi Taraka. Mahesh Tilekar has also criticized Aroh’s criticism. . “On which I am writing a post, you are scared and you are sending me a message without threatening, whether your father owns it or the state is here, you are threatening me as to who will hold the event,” said Mahesh Tilekar.

News English Title: Mahesh Tilekar slams Aroh Velankar over his supporting political party news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x