17 March 2025 7:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, शेअर्स प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK Rattan Power Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ आला पेनी स्टॉक, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, शेअर प्राईस 42 रुपये, मिळेल 56% परतावा - NSE: IRB Horoscope Today | 18 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस, तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 18 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या GTL Infra Share Price | शेअर प्राईस 1 रुपया 49 पैसे, 492% परतावा देणारा पेनी स्टॉक फोकसमध्ये - NSE: GTLINFRA TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, एचएसबीसी ब्रोकरेजकडून BUY रेटिंगसह टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS
x

'तिला जगू द्या' गाण्यावरून कलाकारांमध्ये 'मला भांडू द्या' | टिळेकर आणि आरोह वेलणकर भिडले

Aroh Velankar, Mahesh Tilekar, Amruta Fadnavis, Tila Jagu Dya

मुंबई, २१ नोव्हेंबर: भाऊबीजेचे औचित्य साधून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी ‘तिला जगू द्या’ (Tila Jagu Dya) हे गाणे सोशल मिडियावर प्रदर्शित केले. अमृता फडणवीसांच्या आवाजातील या गाण्यावर अनेकांनी टिका केली तर अनेकांनी कौतुक देखील केले. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर टिका करत अमृता फडणवीस यांना खडे बोल सुनावले. तिला गाऊ नको द्या असे म्हणत त्यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट केली.

यावर अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Velankar) यांनी टिका करत मराठी तारका सारखा कार्यक्रम करणारे तुम्ही एका स्त्री बद्दल कसली भाषा करत तुमची पोस्ट वाचून लाज वाटली असे फेसबुकला पोस्ट केली आहे. आरोहच्या या टिकेला महेश टिळेकर यांनी देखील सडकून टिका केली आहे. . “जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश देतोय, तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथ, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू धमकी देऊन,” असं महेश टिळेकर म्हणाले.

महेश टिळेकर तुमची टीका वाचून लाज वाटली. मराठी तारका नावाचा कार्यक्रम करता, स्त्री शक्ती, सम्मानाच्या गोष्टी करता, आणि ही…

Posted by Aroh Welankar on Friday, November 20, 2020

 

महेश टिळेकर यांनी ‘गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही’ असे आपल्या पोस्टमध्ये म्हणत अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर टिका केली होती.

आरोहच्या या टीकेला टिळेकर तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘बेसूर गाणाऱ्या स्वयंघोषित गायिकेवर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकीवजा संदेश देतोस, तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथं? कलाकार तुझ्या दावणीला बांधले आहेत की त्यांचं पालकत्व घेतलं आहेस म्हणून तुझ्या सांगण्यावरून कलाकार ऐकणार? आधी स्वत:चे करिअर बघ. फूटेज आणि पब्लिसिटी मिळवण्यासाठीच तू बिग बॉस मध्ये गेला होतास ना? का तिथे समाजसेवा करायला गेला होतास? तुझे समविचारी आहेत म्हणून तुला मिरच्या झोंबल्या का?,’ असा प्रश्न टिळेकर यांनी केला आहे.

‘मराठी कलाकारांची लायकी ट्रेननं फिरण्याची आणि गाय छाप तंबाखू खाण्याची आहे असं विधान तू ज्यांचा भक्त आहेस त्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीने केले होते, तेव्हा तुझे रक्त का उसळले नाही? तेव्हा कलाकारांची बाजू घेऊन बोलायला पुढं का आला नाहीस? कुठं पिऊन पडला होतास की शेपूट घालून बसला होतास? तुझं वय जितकं आहे ना तितकी माझी कारकीर्द आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, मराठी भाषा, महापुरुषांचा, महाराष्ट्राचा, मुंबई पोलिसांचा अपमान इतर कलाकार करत होते, तेव्हा तू आईच्या पदराआड लपला होतास की मूग गिळून गप्प बसला होतास? स्त्री सन्मान आणि कला सन्मान यातला आधी फरक ओळखायला शिक. जे बेसूर आहे त्याला अमृतवाणी समजून डोक्यावर घेणाऱ्यातला मी नाही. ‘पुण्यात हनुमंत गायकवाड यांच्या ऑफिसमध्ये भेटून माझ्याकडे काम मागत होतास, ते विसरलास का? जिथं बोलायचं तिथंच मी बोलतो आणि तुझ्यात खरी हिंमत असेल तर समोर येऊन धमकी दे. माझी पोस्ट वाचून जी आग आणि धूर बाहेर येत आहे तो तुझ्या शरीरातील नेमका कोणत्या अवयावामधून येतोय ते पाहून तुझं बिन टाक्याचे ऑपरेशन करायचे की टाके घालून ते मला ठरवता येईल, असं आव्हानच टिळेकर यांनी आरोह वेलणकरला दिलं आहे.

Aroh Velankar बेसूर ,गाणारी स्वयंघोषित गायिका, जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश…

Posted by Mahesh Tilekar on Friday, November 20, 2020

 

News English Summary: Actor Aroh Velankar has posted on Facebook that he was ashamed to read your post about a woman who is doing programs like Marathi Taraka. Mahesh Tillekar has also criticized Aaroh’s criticism. . “On which I am writing a post, you are scared and you are sending me a message without threatening, whether your father owns it or the state is here, you are threatening me as to who will hold the event,” said Mahesh Tillekar.

News English Title: Aroh Velankar Vs Mahesh Tilekar war on social media over Amruta Fadnavis song Tila Jagu Dya News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x