भाजप तोंडघशी | आत्महत्याग्रस व्यापाऱ्याच्या नोटमध्ये NCP नव्हे भाजपचा कार्यकर्ता
बारामती, 20 नोव्हेंबर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानच्या शेजारील घरामध्ये एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे. पवार यांच्या शेजारी राहणाऱ्या प्रीतम शाह यांनी आत्महत्या केली असून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावं आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मुलाने बारामती पोलिसांकडे नऊ जणांविरोधात तक्रार केली आहे. या प्रकरणामध्ये सहा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून तीन जण फरार असल्याचे वृत्त सकाळी प्रसिद्ध झालं होतं.
बारामतीचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये काही सावकार आपल्याला त्रास देत असल्याचे शाह यांनी म्हटलं आहे. याच लोकांच्या जाचाला आपण कंटाळलो असून निराशेमुळे आपण आत्महत्या करत आहोत, असंही या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे. शाह यांच्या मुलाने या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. शाह यांच्या मुलाने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नगरसेवक जयसिंह देखमुख, कुणाल काळे, संजय काटे, विकास धनके, प्रवणी गालिंदे, हनुमंत गवळी, सुनील अवाळे, संघर्ष गव्हाळे, मंगेश आमासे यांच्या नावांचा उल्लेख आहे. यापैकी एकजण बारामती बाजार समितीचे माजी अध्यक्ष आहे. प्रीतम यांनी दाखल केलेल्या तक्रारीमधील जवळवजवळ सर्वजण राजकारणाशी संबंधित आहेत. आरोपींपैकी काहीजण नगरसेवक असून बारामती सहकारी बँकेच्या संचालकपदी असणाऱ्या व्यक्तीचाही आरोपींच्या यादीत समावेश असल्याचे वृत्त पसरलं.
मुख्यमंत्री महोदय जो निकष लावून अर्णब गोस्वामी यांना अटक केली, तोच निकष लावून आता या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धेंडांवर कारवाई करा…
झेपेल काय??? @OfficeofUT https://t.co/xXuZIasaHM— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 19, 2020
मात्र व्यापाऱ्याने आत्महत्या करताना लिहिलेल्या नोटमध्ये नामोल्लेख असलेल्या लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीमात्र संबंध नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे. बारामतीतील व्यापाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून या आत्महत्या प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याला महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले असून त्या लोकांचा राष्ट्रवादीशी संबंध नाही असे स्पष्ट केले आहे. जयसिंह देशमुख हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही.
वास्तविक तो राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून आलेला नगरसेवक आहे. जी उर्वरित नावे आहेत त्यात संघर्ष गव्हाले हा भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते विजय गव्हाले यांचा मुलगा आहे. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध जोडू नये आणि राष्ट्रवादीची बदनामी करू नये, असे महेश तपासे यांनी भारतीय जनता पक्षाला बजावले आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचा खोटा धंदा ताबडतोब बंद करावा. कारण नसताना बेजबाबदारपणे राष्ट्रवादीची बदनामी करू नये असा इशाराही महेश तपासे यांनी दिला आहे.
News English Summary: A businessman has committed suicide near the residence of Deputy Chief Minister Ajit Pawar in Baramati. Pritam Shah, a neighbor of Pawar, has committed suicide and police have also found a letter written by him before his suicide. The letter, written before the suicide, names local NCP leaders. The son of the suicide victim has lodged a complaint with Baramati police against nine persons. Six people have been arrested so far in the case and three were absconding this morning.
News English Title: Baramati businessman suicide NCP rejects BJP allegations News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या