29 April 2024 4:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

महाविकास आघाडी धर्म | चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

Amravati, rebelled candidate, Shekhar Bhoyar, expelled from NCP

अमरावती, २७ नोव्हेंबर : विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची पक्ष शिस्त मोडल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.

अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी (Shivsena Amravati Teacher’s Constituency MahaVikas Aghadi candidate Shrikant Deshpande) दिली आहे. या मविआच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांनी अपक्ष उमेदवारी (Rebelled Candidate Shekhar Bhoyar) अर्ज दाखल करुन निवडणूक लढवत आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही पाठिंबा दिलेला नाही. पक्षाची शिस्त भंग केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीच्या या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात चंद्रशेखर भोयर हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवत आहेत. याची गंभीर दखल घेत भोयर यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी सांगितले. त्याचवेळी भोयर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही पाठिंबा दिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

News English Summary: Mahavikas Aghadi has given official candidature to Shrikant Deshpande of Shiv Sena from Amravati Shikshak constituency. Chandrasekhar alias Shekhar Bhoyar is contesting the election by filing an independent candidature against the official candidate of this Mavia. He was not supported by the NCP. The action has been taken as per the order of state president Jayant Patil for violating party discipline.

News English Title: Amravati rebelled candidate Shekhar Bhoyar expelled from NCP party news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x