सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाईफ टाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज हे कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे ठरणार असून सिंधुदुर्ग जिल्हाचा विकास आणि इथल्या आरोग्य समस्येसाठी हे वरदान ठरणार आहे यात काहीच शंका नाही. नारायण राणे यांनी असं ते महत्वाकांक्षी स्वप्नं बघितलं आणि ते सत्यात सुद्धा उतरवलं असच म्हणावं लागेल.

या आधी कोणत्या सुद्धा गंभीर आजारावर चांगले उपचार घेण्यासाठी कोकणाबाहेर म्हणजे गोवा, मुंबई, पुणे किंव्हा कोल्हापूरला जावं लागत असे. परंतु आता जिल्ह्यातच एक अत्याधुनिक आणि विस्तीर्ण असं दर्जेदार लाईफ-टाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज खासदार नारायण राणेंच्या आत्मविश्वासातून उभ राहिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विषयक समस्या निकाली निघणार आहेत.

तसेच काही दिवसांपासून गोवा सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन येणाऱ्या रुग्णांकडून अधिक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने सिंधुदुर्गवासियांचं आरोग्य विषयक आयुष्य अधिकच बिकट झालं होत. परंतु तो आरोग्याचा प्रश्न आता संपुष्टात आला आहे कारण लाईफ टाईम सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज जिल्ह्यात आल्याने मोठी दीर्घकालीन गैरसोय कायमची टळली आहे.

दुसरं म्हणेज खासदार नारायण राणेंच्या या महत्वाकांक्षी अत्याधुनिक हॉस्पिटलमुळे जिल्ह्यात मेडिकल टुरिझमला बळ मिळणार आहे. विशेष म्हणजे हे हॉस्पिटल अत्याधुनिक असले तरी स्थानिक सिंधुदुर्गवासियांसाठी माफक दारात इथे वैद्यकीय पुरविली जाणार आहे. तसेच हॉस्पिटलचा जागतिक दर्जा टिकविण्यासाठी येणारा खर्च भागविण्यासाठी मेडिकल टुरिझमची संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे खासदार नारायण राणे म्हणाले. दर्जाचा विचार करता लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या मशिनरी आणलेल्या आहेत असं ही राणे यांनी स्पष्ट केलं.

मुळातच सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे याठिकाणी मेडिकल टुरिझमला चांगली संधी असून इथे मेडिकल टुरिझमची संकल्पना यशस्वी होईल, असा विश्वास खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला.

MP Narayan Ranes ambitious multi speciality hospital will solve the health issue in Sindhudurga District