2 May 2024 1:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?
x

IND Vs AUS T20 | सलग दुसरा T-२० सामना जिंकत भारताची मालिकेत बाजी

India tour of Australia 2020, T20 cricket match, Sydney ,Indian victory

सिडनी, ६ डिसेंबर: शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने टी 20 मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 2 चेंडूआधी पूर्ण केलं.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी भारता समोर १९५ धावांचे आव्हान दिले होते. भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १४ धावांची गरज होती. हार्दिकने अखेरच्या ओव्हरमध्ये दोन षटकार मारत विजय मिळून (Hardik hit two sixes in the final over to seal the victory) दिला. या विजयासह भारताने ३ सामन्यांची टी-३० मालिका २-० अशी जिंकली. भारतीय संघाचा टी-२० क्रिकेटमधील हा सलग दहावा विजय आहे. याबाबत त्यांनी पाकिस्तानला मागे टाकले.

१९५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारत सहज हार मानणार नाही हे स्पष्ट केलं. ५६ धावांची भागीदारी झाल्यानंतर अँड्रू टायने राहुलला माघारी धाडलं. यानंतर शिखर आणि विराटने पुन्हा एकदा जम बसवत भारताच्या डावाला आकार (Shikhar and Virat once again shaped India’s innings) दिला. यादरम्यान शिखरने आपली फटकेबाजी सुरु ठेवत अर्धशतक झळकावलं. ही जोडी मैदानावर कमाल करणार असं वाटत असतानाच, झॅम्पाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात शिखर बाद झाला. त्याने ३६ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली.

 

News English Summary: Australia had challenged India for 195 runs to win. India needed 14 runs in the last over to win. Hardik hit two sixes in the final over to seal the victory. With this victory, India won the three-match T20 series 2-0. This is the tenth consecutive victory of the Indian team in T20 cricket. He surpassed Pakistan in this regard.

News English Title: India tour of Australia 2020 second T20 cricket match Sydney Indian victory news updates.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x