पालघर : आज पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. संपूर्ण निवडणूक यंत्रणा सुसज्ज झाली असून या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. हे व्हीव्हीपॅट मशीन गुजरातमधील सुरत व बडोदा येथून आणण्यात आली आहे.
आज होणाऱ्या मतदानानंतर निकाल ३१ मी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. भाजपच्या अनेक जागा पोटनिवडणुकीत कमी झाल्या असून त्यांचा बहुमताचा आकडा सुद्धा खाली घसरत आहे. त्यामुळेच भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे.
मागील आठवडाभर भापज आणि शिवसेनेमधील प्रचारादरम्यानचा संघर्ष अत्यंत शिगेला गेला होता. भाजपवर थेट पैसे वाटल्याचा आरोप सुद्धा झाला असून काही व्यक्तींना रंगेहात ताब्यात सुद्धा घेण्यात आलं होत.
मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपनेही भाजप आणि शिवसेनेच्या वादात आगीचं काम केलं. त्यामुळे निकालात नक्की काय होणार ते पाहावं लागेल.
तर दुसरीकडे भंडारा-गोंदियात मुख्यालढ्त ही भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आहे.
