18 February 2025 5:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | खुशखबर, आता महिना अवघ्या 250 रुपयात म्युच्युअल फंडातून पैसा वाढवा, SBI जन-निवेश SIP योजना लाँच EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांना महिना 7500 रुपये ईपीएफ पेन्शन मिळणार, अपडेट जाणून घ्या BEL Share Price | डिफेन्स शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: RELIANCE GTL Share Price | 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, जीटीएल कंपनी पेनी स्टॉक फोकसमध्ये Horoscope Today | मंगळवार 18 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा मंगळवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, 22 फेब्रुवारीपासून या 3 राशींसाठी चांगला काळ सुरु होणार, तुमची राशी आहे का?
x

गुरुद्वारा दौरा अचानक | कॉपीपेस्ट मीडिया मॅनेजमेंटमध्ये चूक | रकाबगंज'चं 'रकाबजंग'

Prime Minister Narendra Modi, Delhi Gurudwara

नवी दिल्ली, २० डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी दिल्लीतील एका गुरुद्वाराला भेट दिली आहे. दिल्ली स्थित गुरुद्वारा रकाबगंजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आणि गुरु तेगबहादुर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अगदी अचानक त्यांचा हा दौरा झाला आहे. या दौऱ्यादरम्यान वाहतूक देखील थांबवण्यात आली नाही.

नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रकाबगंज येथील गुरुद्वारात जाऊन शीख समुदायाचे 9 वे गुरू तेग बहादूर यांना नमन केले. गुरू तेग बहादूर यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मोदींचा आजचा गुरुद्वाराचा दौरा अचानक ठरल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. मोदींच्या गुरुद्वारा भेटीचं कुठलंही नियोजन नव्हता, विशेष म्हणजे मंदिर व्यवस्थापनालाही यासंदर्भात काहीही कल्पना नव्हती. त्यामुळे, मोदींच्या या दौऱ्यावर चर्चेला उधाण आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोणतीही एखादी भेट किंवा बैठक कितीही गुप्त आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असली तरी मीडिया मॅनेजमेंटमध्ये काहीही गुप्त न ठेवता बातम्या पेरल्या जातात. कडेकोट सुरक्षा असली तरी मोदींसोबत असणाऱ्या फोटोग्राफरला सर्वाधिक स्वातंत्र्य असतं असं झळकणाऱ्या फोटोंवरून दिसतं. आजच्या दौऱ्यातही एक चूक झाली. भेट अचानक असल्याचं एकाबाजूला पेरलेलं असताना दुसऱ्या बाजूला मीडिया मॅनेजमेंटच्या नादात व्हाट्सअँप ग्रुपवर माध्यमांच्या प्रतिनिधींना सदर वृत्त पोहोचविण्याच्या नादात प्रत्यक्ष ठिकाणाचं म्हणजे ‘रकाबगंज’ ऐवजी ‘रकाबजंग’ टाईप करण्यात आलं. त्यानंतर तेच सर्वत्र कॉपीपेस्ट करून माध्यमांनी मोदींच्या प्रति असलेलं नितांत प्रेम व्यक्त करत ते देशापर्यंत पोहोचवलं.

 

News English Summary: No matter how secret and important any security meeting of Prime Minister Narendra Modi is, news is sown in media management without keeping anything secret. Despite the tight security, the photographers who are with Modi show that they have the most freedom. There was also a mistake in today’s tour. While it was rumored that the meeting was unexpected, on the other hand, instead of conveying the news to the media representatives on the WhatsApp group in the name of media management, the actual place was typed ‘Rakabganj’ instead of ‘Rakabganj’. After that, the media spread the same love for Modi by copying and pasting it everywhere.

News English Title: Prime Minister Narendra Modi surprise visit to Delhi Gurudwara news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x