9 June 2023 12:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

तिहार जेलमध्ये चौकशीनंतर पी चिदंबरम यांना ईडीकडून अटक

P Chidambaram, INX Media Case

नवी दिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आली आहे. ईडीच्या तीन सदस्यांच्या टीमकडून पी चिदंबरम यांची तिहार जेलमध्ये चौकशी करण्यात आली. जवळपास एक तास पी चिदंबरम यांची चौकशी सुरु होती. चौकशीनंतर पी चिदंबरम यांना अटक करण्यात आली. मंगळवारी विशेष न्यायालयाने ईडीला पी चिदंबरम यांची चौकशी तसंच अटकेची परवानगी दिली होती. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी पी चिदंबरम ५ सप्टेंबरपासून तिहार जेलमध्ये आहेत.

विशेष न्यायालयाने मंगळवारी ईडीला पी चिदंबरम यांची चौकशी करण्याची तसेच आवश्यकता असल्यास अटकेची परवानगी दिली होती. ईडीने पी चिदंबरम यांच्या अटकेची मागणी केली होती. यावर न्यायालयाने त्यांना चौकशीची परवानगी दिली. तसेच चौकशीदरम्यान हाती लागलेल्या माहितीच्या आधारे अटक करण्याचा निर्णय ईडी घेऊ शकते असेही सांगितले. तिहार जेलमध्ये चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक दाखल झाले होते. त्यानंतर आता अटक करण्यात आली आहे.

तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात जामीन मिळण्याची मागणी चिदंबरम यांनी केली. अपमान करण्यासाठी सीबीआय मला तुरुंगात ठेवत असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी केला आहे. ‘चिदंबरम यांना ६० दिवस तुरुंगात ठेवण्याचे त्यांनी ठरवले आहे. सीबीआय कोठडीत असताना ईडी समोर हजर होण्याची त्यांची इच्छा आहे,’ असे चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले.

सीबीआयने चिदंबरम यांना २१ ऑगस्टला अटक केली होती. त्यानंतर ५ सप्टेंबरपासून ते कोठडीत आहेत. याच प्रकरणात ‘ईडी’ला चिदंबरम यांची चौकशी करायची आहे. यूपीए सरकारमध्ये अर्थमंत्री असताना चिदंबरम यांनी आयएनएक्स मीडिया कंपनीत परदेशी गुंतवणुकीसाठी परवानगी दिली होती. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याने त्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप आहे.

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपूर्वी तिहार तुरुंगामध्ये जाऊन चिदंबरम यांची भेट घेतली होती. त्यावेळी ‘सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांच्या भेटीमुळे मी धन्य झालो. काँग्रेस पक्ष समर्थ व शूरांचा पक्ष असून माझेही वर्तन तसेच राहणार आहे’ असं ट्वीट चिदंबरम यांच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले होते.

हॅशटॅग्स

#Congress(527)#P Chidambaram(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x