27 April 2024 8:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

ग्रामपंचायत निवडणुका जाहीर | पुन्हा महाविकास आघाडी आणि भाजपचं राजकीय युद्ध

Maharashtra, Gram Panchayat election, schedule announced, Election commission

मुंबई, ११ डिसेंबर: राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का दिलेला असताना आता पुन्हा राजकीय वारे वाहू लागले आहेत. राज्यातील ग्रामीण भागात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीत पुन्हा राजकीय युद्ध पेटणार आहे.

महाराष्ट्रातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर (Election Commission announces election program for 14 thousand 234 Gram Panchayat in Maharashtra) करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण १४,२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च २०२० मध्ये सुमारे १५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार १७ मार्च २०२०ला स्थगित करण्यात आल्या होत्या.

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब या निवडणुकांमध्येही पहायला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवविण्याची घोषणा अलीकडेच केली (Shivsena recently announced to contest local body elections with Mahavikas Aghadi) आहे. भारतीय जनता पक्षाने स्वबळाचा निर्णय पूर्वीच घेतला (The Bharatiya Janata Party had already decided on its own) आहे. दोन्ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका अद्याप जाहीर व्हायची आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रथमच होत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीत दिसली तशीच चुरस यामध्ये दिसण्याची शक्यता आहे. प्रशासक नियुक्त्यांच्यावेळी झालेल्या राजकारणातून याची झलक पहायला मिळाली आहे. ग्रामीण भागावर आपली पकड मजबूत करण्यासाठी राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत बाजी मारणाऱ्या महाविकास आघाडीसाठी ही राजकीय आखाड्यातील दुसरी परीक्षा ठरणार आहे.

 

News English Summary: The official election program for 14 thousand 234 Gram Panchayats in Maharashtra has been announced by the Election Commission. The term of these gram panchayats had expired from April to December during the Corona period. Therefore, these elections were postponed. Now the election program of these gram panchayats has been announced and polling will be held on 15th January and counting of votes will be done on 18th January.

News English Title: Maharashtra Gram Panchayat election schedule announced by election commission news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x