मुंबई : भाजपची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेसोबत युती असून ही युती राहिली पाहिजे असं केंद्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मत व्यक्त केलं. आमच्यातील युतीच म्हणजे “तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना” अशी परिस्थिती येते असं सुद्धा नितीन गडकरी म्हणाले.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेने सर्व निवडणुका स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. आंध्र प्रदेशातील टीडीपी भाजप पासून विभक्त झाला तसेच एनडीएमधून सुद्धा काडीमोड घेतला आहे. परंतु शिवसेना भविष्यात एनडीएसोबत असणार की नाही यावर शिवसेनेने अजून काहीच भूमिका घेतलेली नाही. सध्या तरी शिवसेनेचे मंत्री हे राज्यात आणि केंद्रात मांडीला मंडी लावून आहेत. परंतु दोन्ही पक्षतील मतभेद विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत.
एकूणच टीडीपी सत्तेतून तसेच एनडीएमधून सुद्धा बाजूला झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत युतीच्या सर्व अपेक्षा भाजपने सोडून दिल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेना स्वतंत्र निवडणूका लढण्याची घोषणा करते, परंतु एनडीएमधील सहभागाबद्दल मौन पाळते. त्यामुळे कदाचित भाजपला ते पुन्हां निवडणुकीआधी किंव्हा निवडणुकीनंतर युती करतील अशी अपेक्षा असावी असं एकूणच भाजप नेत्यांची विधानं बघून वाटतं.
