14 December 2024 8:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

लोढांवर फसवणूक-खंडणीचा गुन्हा | करमचंद जासुस, मामू-विरोधी पक्षनेते याची पाळेमुळे शोधणार का?

Mangalprabhat Lodha, fraud and extortion, MLA Bhai Jagtap

मुंबई, १३ मार्च: भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांच्या मुलाविरोधात कोर्टाच्या आदेशाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला. सदर प्रकरणी ज्वाला रिअल इस्टेट प्रा. लि. आणि मायक्रोटेक डेव्हलपर्सचे मालक मंगलप्रभात लोढा, त्यांचा मुलगा अभिषेक तसेच सुरेंद्रन नायर यांच्याविरोधात खंडणी, फसवणूक, धमकी या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (BJP president and MLA Mangalprabhat Lodha along with his son were booked at the Chaturangi police station on Friday on a charge of extortion and fraud)

मला धमकावून खंडणी मागितली,’ असा फौजदारी दावा एका ५३ वर्षीय महिले शिवाजीनगर सत्र न्यायालयात दाखल करून याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी दाव्याद्वारे केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने लोढा यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, असे परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, यासंदर्भात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी ट्विट करताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया आणि देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “भाजप चे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल…करमचंद जासुस, मामू-विरोधी पक्षनेते याची पाळेमुळे शोधून काढणार की नाही..?? लोढा यांच्या मुंबई अध्यक्ष पदाचा त्वरित राजीनामा घ्या..!!”

 

News English Summary: In this regard, Mumbai Congress president Bhai Jagtap, while tweeting, has indirectly targeted former BJP MPs Kirit Somaiya and Devendra Fadnavis. In it, he said, “BJP’s Mumbai president MLA Mangalprabhat Lodha has been charged with fraud and extortion.

News English Title: Mumbai congress president MLA Bhai Jagtap indirectly slams Fadnavis and Kirit Somaiya over charged with fraud and extortion on Mangalprabhat Lodha news updates.

हॅशटॅग्स

#BhaiJagtap(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x