राष्ट्रवादीच्या माजी प्रदेश उपाध्यक्षाला ५० कोटीच्या खंडणी प्रकरणात अटक
पुणे, २१ मार्च : पुणे शहरातील एका नामांकित सराफी व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवीत व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल ५० कोटी रुपयांची खंडणीची मागणी गेल्याची धक्कादायक घटना काही दिवस आधी समोर आली होती. या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पोलिस चौकशीसाठी बोलविणार असल्याचं स्पष्ट झालं होतं.
या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पोलिस चौकशीसाठी बोलविले जाणार होते. मंगलदास बांदल हे माजी जिल्हापरिषद सदस्य, बांधकाम समितीचे माजी सभापती आणि शिक्षण समितीचे माजी सभापती आहे. बांदल हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचे निकटवर्तीय असल्याच सर्वश्रुत होतं.बांदल हे वादग्रस्त राहिले असून यापूर्वी २०१७ मध्ये आयकर विभागाने बेहिशेबी मालमत्तेमुळे छापेमारी केली होती.
या प्रकणात आशिष पवार, रमेश पवार, रुपेश चौधरी यांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. यातील आशिष पवार हा काही दिवसांपूर्वी सराफांकडे बॉडीगार्ड म्हणून काम करीत होता. पुण्यातील प्रसिध्द सराफ व्यावसायिक सौरभ गाडगीळ यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणात गाडगीळ यांच्या कुटुंबातील महिलेची एक व्हिडीओ क्लिप चोरून बनवण्यात आली होती आणि ती दाखवून गाडगीळ यांना ब्लॅकमेल करण्यात येत होतं. आशिष चौधरी याने पिस्तूल दाखवून सराफांना कोणाकडे वाच्यता केल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतरही सराफाने आम्ही इतकी मोठी रक्कम देऊ शकत नाही असं सांगितल्यावर सराफांना धमकी दिली जात होती. मात्र यानंतर सराफांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. यानंतर पोलिसांनी आरोपीचे लोकेशन शोधून काढले. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले होते.
दरम्यान, हे प्रकरण समोर येताच मंगलदास बांदल यांचं राष्ट्रवादीतून निलंबन करण्यात आलं होतं. मात्र अन्य आरोपींकडून मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी बांदल यांना आज शनिवारी पुन्हा चौकशीला बोलावले होते. काही वेळ त्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. बांदल यांच्यावर ग्रामीण पोलिसांमध्ये एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे़.
News English Summery: The shocking incident came a few days after a well-known seraphic businessman in Pune threatened to kill a pistol and demanded a ransom of Rs 50 crore from him. It was clear that NCP’s regional vice president Mangaldas Bandal would be summoned for a police inquiry in this case. In this case, Mangaldas Bandal, the regional vice-president of the NCP, was to be called for a police inquiry. Mangaldas Bandal is a former Zilla Parishad member, former chairman of the construction committee and former chairman of the education committee. Bandal is known for being a close relative of NCP leader Ajit Pawar. Bandal has been controversial since the Income Tax Department had raided the property in 2017 due to unaccounted assets. Meanwhile, Mangaldas Bandal was suspended from the NCP when the matter came to light. However, Bandal was summoned again on Saturday to verify the information received from the other accused. After interrogating them for some time, the police arrested them. Bandal has been charged with fraud in rural police.
News English Title: Story former NCP Vice President Mangaldas Bandal arrested 50 crore extortion case Pune News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा