व्हिडिओ कॉलवरुन धमकी आणि १ कोटीची ऑफर | गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल

जळगाव, 18 डिसेंबर: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या (BJP leader and former minister Girish Mahajan) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कारण गिरीश महाजन यांच्यावर जळगावातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी २०१८ मध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराबद्दल ८ डिसेंबरला त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित, जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी भोईटे गटाने अॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलावून चाकूचा धाक दाखवत जबर मारहाण केली. त्याच दरम्यान व्हिडिओ कॉलवरुन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एक कोटी रुपयांची ऑफर दिली, असा आरोप करत निंभोरा पोलीस ठाण्यात गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गटातील सदस्यांवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमध्ये वाद आहेत. जवळपास ५ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तानाजी भोईटे यांच्या गटाला नरेंद्र भास्कर पाटील यांनी निवडणुकीत पायउतार केल्यानंतर देखील भोईटे गट संस्थेवर ताबा सांगत असून दोन्ही गटांमध्ये आजवर अनेकदा संघर्ष झालेला आहे. या पार्श्वभूमीवर, मध्यंतरी भोईटे गटाला तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांचा पाठींबा असल्याची चर्चा होती. याच अनुषंगाने दिवंगत नरेंद्र पाटील यांचे बंधू अॅड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
दुसरीकडे, राज्यातील बहुचर्चित बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारात एक महत्वाची आणि अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली होती. बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने जामनेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले (Pune Economic Crimes Branch arrests former Jamner Municipal Corporation mayor Paras Lalvani for questioning) होते. चौकशीनंतर जामनेरात दाखल होताच पारस ललवाणी यांनी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन गंभीर खुलासे केले होते. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.
News English Summary: BJP leader and former minister Girish Mahajan’s troubles are increasing day by day. A case has been registered against Girish Mahajan at Nimbhora police station in Jalgaon. A case has been registered against him on December 8 for a shocking incident that took place in January 2018. Maratha Vidya Prasarak Sahakari Samaj Limited, Jalgaon. Vijay Patil was called to Pune and severely beaten with a knife. Meanwhile, a serious case has been registered against Girish Mahajan and members of the Bhoite group at the Nimbhora police station, alleging that former minister Girish Mahajan made an offer of Rs 1 crore through a video call.
News English Title: FIR complain registered Against BJP leader Girish Mahajan over threatening crime news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC