मुंबई : संपूर्ण देशभरात भाजपविरोधात सर्वच पक्षांमध्ये रोष वाढतच आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख सहकारी पक्ष शिवसेना भाजपवर प्रचंड नाराज आहे त्यामुळे आगामी काळात राजकारणातील सर्वात मोठं बंड हे महाराष्ट्रात होईल असं सूचक विधान जेडीयूचे शरद यादव यांनी केलं आहे.
सध्या आरजेडीचे अध्यक्ष लालुप्रसाद यादव हे मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एशियन हार्ट रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी शरद यादव मुंबईमध्ये आले होते. तसेच त्यांनी रात्री उशिरा माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची सुद्धा भेट घेतली.
परंतु त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शरद यादव म्हणाले की, माझे राज्यातील ठाकरे कुटुंबियांशी चांगले आणि कौटुंबिक संबंध आहेत. परंतु त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
