2 May 2024 5:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा
x

मोदी देतील त्या दराने शेतमाल खरेदी करा | असे फडणवीसांनी शेतकऱ्यांना सांगावे

Former MP Raju Shetti, Devendra Fadnavis, Farmers protest

नवी दिल्ली, २३ डिसेंबर: नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन अजुनही सुरूच आहे. तीनही कायदे रद्द करा अशी शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. याच मुद्यांवर शेतकरी संघटना अडून बसल्या आहेत. तर कायदे रद्द होणार नाहीत अशा भूमिकेवर सरकार ठाम आहे. त्यामुळे हा पेच कसा सुटणार असा सवाल आता विचारला जातोय. आतापर्यंतच्या चर्चेच्या फेऱ्यांमधून फार काहीच निघालं नाही. मागील २८ दिवसांपासून आंदोलक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसले आहेत. त्यानंतरही पुन्हा एकदा ही चर्चा सुरू व्हावी यासाठी सरकारला प्रयत्न आहे.

याच विषयाला अनुसरून कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी विधेयकावरून मोदी, फडणवीस व खोत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, कृषी विधेयकावरून देशभरातील शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. काल मुंबईत मध्यरात्री संचारबंदी लागणार हे माहित असतानाही पंधरा हजारांवर शेतकरी उद्योगपती अंबानीच्या कार्यालयावरील मोर्चात सहभागी झाले होते. टाळेबंदी काळामध्ये अंबानी-अदानी या उद्योगपतींना मोठा तोटा झाला आहे. तो भरून काढण्यासाठी त्यांना अन्नधान्याच्या बाजारामध्ये केंद्र शासन उतरवत आहे. त्यामुळे हे बडे भांडवलदार मागतील त्या दराने धान्य शेतकऱ्यांना शेतमाल शेतकऱ्यांना विकत घ्यावा लागणार आहे. मोदी सांगतील त्या दराने शेतमाल खरेदी करा, असे फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सांगावे. आत्मनिर्भरतेचे ढोल वाजवणाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहचवा, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, भारतीय किसान युनियनचे युद्धवीर सिंह यांनी सांगितले की, ज्या प्रकारे केंद्र ही चर्चा पुढे नेत आहे, त्यावरून हे स्पष्ट होतेय की सरकार मुद्दामहून विलंब करू पाहत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल तुटेल असा प्रयत्न आहे. सरकार आमचे मुद्दे हलक्यात घेत आहे. लवकरात लवकर या प्रकरणावर तोडगा काढावा हा आमचा इशारा आहे. सरकारने आगीशी खेळू नये आणि हट्ट सोडून आमची कायदे रद्द करण्याची मागणी ऐकावी.

 

News English Summary: The Ambani-Adani industrialists have suffered huge losses during the lockout period. To make up for it, the central government is putting them in the food market. Therefore, grain farmers will have to buy farm produce at the rate demanded by these big capitalists. Fadnavis should tell the farmers to buy farm produce at the rate that Modi will tell them. He urged those who play the drum of self-reliance to convey this information to the farmers.

News English Title: Former MP Raju Shetti criticized Devendra Fadnavis over farmers protest over new agriculture laws news updates.

हॅशटॅग्स

#RajuShetti(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x